टप्याटप्याने शाळा सुरू करण्याच्या हालचाली - कुठे ते वाचा? 

fail photo
fail photo

नांदेड : कोरोना महामारीच्या संक्रमणामुळे प्रचलित नियमानुसार यंदा शाळा ता. १५ जूनपासून सुरू करण्यास अडचणी निर्माण झाल्या. कोरोनाच्या संकटाला तोंड देत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा ऑनलाइन सुरू करण्याचा प्रस्ताव समोर आला. पण ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर शाळांच्या भौतिक सुविधांपासून सर्वच विद्यार्थ्यांकडे मोबाईल असतीलच असे नाही. त्यामुळे ऑनलाइन शाळा सुरू करण्यावर पडदा पडला. 

ता. १५ जूनच्या शासनाच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांनुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रशांत दिग्रसकर यांनी टप्या-टप्याने शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी ता. २० जून रोजी झूम ॲपवर बैठकीद्वारे संवाद साधला. 

‘आस' शिक्षक संघटनेतर्फे राज्याध्यक्ष युवराज पोवाडे व नांदेड जिल्हाध्यक्ष नईमोद्दीन शेख यांनी शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक पातळींवरील अडचणींकडे लक्ष वेधले. शिक्षणाधिकारी श्री. दिग्रसकर यांनी संघटना व पदाधिकाऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ग्रामपंचायतीमार्फत बाहेर गावातून येणाऱ्या शिक्षकांची गावात येण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे तपासणीची खातरजमा करावी.

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित राहिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून ऑनलाईन प्लॅटफॉर्म टीव्ही, रेडीओ, दिक्षा अॅप आदी साधनाद्वारे अध्ययनासाठी विद्यार्थ्यांना मदत करावी, विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिक स्वास्थ्यांचा विचार करून डिजीटल शिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांचा अभ्यास वेळेच्या मर्यादेतच व्हावा, टप्या-टप्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याविषयी स्थानिक पातळीवर प्रशासन, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने एकत्रित निर्णय घ्यावा, प्रत्येक दिवशी दहा ते पंधरा पालकांना संपर्क करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेणे अवश्यक असल्याच्या सुचना दिल्या.  

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचननुसार खबरदारीच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजाणीसाठी विद्यार्थ्यांना जागृत व प्रोत्साहित करणे अत्यावशक आहे. शिक्षकांनी स्वतःची कोविड १९ कोरोनाबाबत आरोग्य तपासणी करुन घेऊन तपासणीचे प्रमाणपत्र स्थानिक कोरोना नियंत्रण समितीकडे जमा कण्याचे सूचित केले. शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांची कोविड १९ ची प्रशासनामार्फत सर्व शिक्षकांची मोफत कोरोना बाबतची तपासणी करण्याची मागणी केली. 

शाळा सुरू करण्याची पूर्वतयारी
स्थानिक पातळीवर शाळा सुरू करण्याची पूर्वतयारी करण्याचे आदेश जारी करत सर्व शिक्षकांनी दररोज शाळेत जावे, शालेय पोषण आहार तुर्तास शिजवून देऊ नये, टप्या- टप्याने शाळा सुरू करताना शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असेल तर शारिरिक अंतर (फिजीकल डिस्टन्सिंग) चा नियम पाळून शाळा शिफ्टमध्ये भरवावी, मुख्यालयी राहणेबाबत शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा करून निर्णय घ्यावा, मोफत पाठ्यपुस्तक वितरण करावे.

कंटेंटमेंट झोनमधील शाळांची सुरूवात करताना जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाणार आहे. इतर महत्वपूर्ण बाबींविषयी सर्व ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेमार्फत लेखी आदेश देण्यात येतील.

विद्यार्थ्यांच्या स्वास्थ, आरोग्य हितासाठी शिक्षकांनी वरिष्ठांबरोबर आरोग्य यंत्रणेशी समन्वय राखावा त्याचबरोबर मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करून शाळा टप्या- टप्याने सुरू करण्याबाबत लवकरच आदेश जारी करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रशांत दिग्रसकर यांनी सुचित केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com