esakal | दिवाळीत एसटीची कोटीची उड्डाणे, परभणी आगाराची १० दिवसात चार कोटीची कमाई
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दरवर्षी दिवाळीच्या आधी नंतर एसटी गाड्या फुल भरून जातात. त्यामुळे हा काळ एसटीचा कमाईचा काळ असतो. मात्र यंदा कोरोना विषाणु संसर्गामुळे एसटीच्या या कमाईला फटका बसतो की काय अशी भिती व्यक्त होत होती.

दिवाळीत एसटीची कोटीची उड्डाणे, परभणी आगाराची १० दिवसात चार कोटीची कमाई

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः कोरोनाच्या संकटाचा सामना करत असलेल्या एसटी महामंडळाला यंदाची दिवाळी मात्र पावली आहे. दिवाळीपासून ते नंतर झालेल्या १० दिवसाच्या सेवेत एसटी महामंडळाच्या परभणी विभागाने तब्बल चार कोटी एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

दरवर्षी दिवाळीच्या आधी नंतर एसटी गाड्या फुल भरून जातात. त्यामुळे हा काळ एसटीचा कमाईचा काळ असतो. मात्र यंदा कोरोना विषाणु संसर्गामुळे एसटीच्या या कमाईला फटका बसतो की काय अशी भिती व्यक्त होत होती. परंतू एसटी महामंडळाने कोरोनाच्या संकटातही दिवाळीचे नियोजन करून कमाई करून घेतली आहे. परभणी विभागातील सातही आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या. याचा फायदा एसटीला कॅश करता आला आहे.

कोरोनामुळे एसटी महामंडळाची सेवा मार्च ते ऑगस्ट या पाच महिण्यात बंद होती. ऑगस्टमध्ये शासनाने एसटी महामंडळाच्या बसगाड्याना कोरोनाचे नियम घालून प्रवाशी वाहतुकीची परवानगी दिली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची देखील परवानगी मिळाली. ११  ते २० नोव्हेंबर या कालावधीत परभणी विभागातून एसटीच्या झालेल्या विविध फेर्‍यामध्ये १२ लाख ९७ हजार किलोमीटर प्रवास करत एकूण चार कोटी एक लाख ४४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले.

हेही वाचा - नांदेड : चाईल्ड लाईनचा मैत्रीचा बंध बांधणे उपक्रम -

आगारांचा उत्पन्नात असा राहिला वाटा

परभणी आगार ः ७७ लाख १६ हजार, जिंतूर आगार ः  ५१ लाख ९५ हजार, हिंगोली आगार ः  ६२ लाख ४२ हजार, गंगाखेड आगार ः ६४ लाख ६३ हजार,  पाथरी आगार ः एक लाख ८२हजार ५४ लाख ५८ हजार, वसमत आगार ः एक लाख ७४ हजार रुपयांचे ५१ लाख ७२ हजार,  कळमनुरी आगार ः ३८ लाख ९८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

कोरोनाच्या सुरवातीच्या काळानंतर मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. सध्या दिवसाला ४० ते ५० लाखाचे उत्पन्न येत आहे. आगामी काळात अत्याधिक चांगली व वेळेवर गाड्या देण्याचे काम महामंडळाचा परभणी विभाग करणार आहे.

- मुक्तेश्वर जोशी, विभागीय नियंत्रक, एस.टी. महामंडळ परभणी.

संपादन- प्रल्हाद कांबळे