नांदेड जिल्ह्यातील 'या' शाळेतील विद्यार्थ्यांनी केली 3,165 सीडबॉलची निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

seedboll

नांदेड जिल्ह्यातील 'या' शाळेतील विद्यार्थ्यांनी केली 3,165 सीडबॉलची निर्मिती

नांदेड : जिल्हा परिषद शाळा, शिराढोण तांडा (ता. कंधार) या शाळेतील (Z.P.School shiradhon) उपक्रमशील शिक्षक शिवाजी कपाळे यांच्या संकल्पनेतून व वर्ग पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून आगामी पावसाळ्यात देशी झाडे लावून ती जगवण्यासाठी तीन हजार 165 सीडबॉल तयार करण्यात आले आहेत. ह्या सीडबाॅलद्वारे (seedboll) समाजाच्या व आपल्या हितासाठी एक आगळी वेगळी नैसर्गिक चळवळ सुरु केली आहे. (Students- 'this'- school- in Nanded- district -produced 3,165- seedballs)

सद्य परिस्थितीत सर्व जग हे कोरोना महामारीशी झुंज देत आहे. यामध्ये आॉक्सिजन अभावी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर काही जीव मुठीत धरुन बसलेले आहेत. पर्यावरण जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने या शाळेतील 45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून तीन हजार 165 देशी सीडबॉल तयार केले आहेत. सीडबॉलसाठी काळी माती, राख व शेणखताचा वापर करुन लिंब, चिंच, साग, जांभूळ, बीबी, चार, टेंबर ई. देशी झाडांचा समावेश आहे.

हेही वाचा - गडचिरोली पोलिस स्मृतिदिनीच पोलिसांनी घेतला बदला. नक्षलवादी चकमकप्रकरणी सी-४७ अलर्ट- पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे

या अभियानातून तयार होणार्‍या झाडांतून प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. सदरील सीडबॉल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुकाईचा माळ, महादेव मंदीर खांडी व रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणार आहे. हे अभियान प्रत्येक शाळांनी राबवावे, असे आवाहन वनश्री पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवाजी कपाळे यांनी केले.

loading image
go to top