esakal | Success Story : नांदेड : बळेगाव येथील नैसर्गिक गुळाला महाराष्ट्रसह शेजारील राज्यामध्ये मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शंभर मजूरांच्या हाताला मिळाले काम, महिला व पुरुषांना मिळाला गावातच रोजगार.

Success Story : नांदेड : बळेगाव येथील नैसर्गिक गुळाला महाराष्ट्रसह शेजारील राज्यामध्ये मागणी

sakal_logo
By
चंद्रकांत सूर्यतळ

बरबडा ( ता. नायगाव, जिल्हा नांदेड ) : नायगाव तालुक्यातील बळेगाव येथील गोविंदराव  बेलकर यांना गुळ उद्योगातून मिळतात वर्षाला ४० लाख उत्पन्न, शेतकरी शेतात काहीच उत्पन मिळत नाही म्हणून अनेक शेतकरी शेती व्यवसाय सोडून शेतीपासून दूर होत चालले आहेत. मात्र माहितीपूर्ण शेती व आधुनिक तंत्रज्ञानच्या मदतीने शेती केल्याने स्वत: माल उत्पादन करुन महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि तेलंगना या राज्यामध्ये विक्री करुन शेती पूरक व्यवसायात भरपूर उत्पन्न मिळविता येते. हे गोविंदराव बेलकर या उच्चशिक्षित शेतकऱ्याने दाखवून दिले. 

नायगाव तालुक्यापासून व कुंटुरपासून नऊ कि. मी. अंतरावर असलेले बळेगाव हे गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. बळेगाव येथे गोदावरी नदीवर  उच्चपातळी बंधारा बनवून भरपुर पाण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे गावात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते आहे. याच गावातील शेतकरी गोविंदराव बेलकर( इंजिनियर ) यांनी ३८ वर्ष  सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी केली. मात्र त्यांना शेतीपुरक व्यवसाय करायचा होता. कुटुंबाची  दहा एकर जमीन असल्याने त्यांनी नवीन शेती उद्योगाची माहिती, प्रशिक्षण घेऊन गुळ उद्योगाची सुरवात केली. सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड करुन त्या ऊसाचे गुळ बनविण्याचे त्यांनी ठरवले. रसायन विरहीत, विषमुक्त गुळाला जास्त मागणी असल्याचे त्यांना माहिती झाली. 

हेही वाचाSuccess Story:नांदेडमध्ये पहिल्यांदाच स्ट्रॉबेरीची लागवड, डेरला येथील अर्जुन जाधव यांचा यशस्वी प्रयत्न -

मग त्यांनी आपल्या शेतात श्री साई गुळ उद्योग नावाने गुऱ्हाळ कंपनी बनविली. त्यासाठी लागणारे साहित्य चरक मशीन, कढई, साचे, गुजरातमधुन खरेदी केले. सदर गुळ उद्योगाला २००१ ला सुरवात केले अस्ल्याचे बेलकर यांनी सांगितले. उद्योग सुरु करण्यासाठी त्यांना दोन लाख रुपये खर्च आला. उद्योगाची सुरुवात झाली तेंव्हा त्यांच्याकडे फक्त दोन कढई होत्या. आज घडीला आठ कढई झाल्या आहेत. तीन तासात गुळ तयार होतो. एका कढईत एक हजार लिटर पाक उकळल्या जाते. ऊसाचा रस होऊन सदर रस नळाद्वारे कढईत येऊन पडतो. अशी सोय त्यांनी केली आहे. दोन हजार टन ऊसाचे गाळप करुन २२५ टनगुळाची निर्मिती केली जात आहे.

सदर ऊसाचा रस काढल्यानंतर चीवटीचा वापर चुलीमध्ये पाक उकलण्यासाठी केला जात आहे. सदर राख ही मळीचे सेंद्रीय खत केले जात आहे. हे खत पुन्हा शेतीसाठी वापरले जात आहे. या प्रकल्पात १०० महिला, पुरुष कामाला आहेत. या रोजगारांना महिन्याकाठी साडेतीन लाख रुपये रोजंदारी द्यावी लागते. गुळ हा नैसर्गिक पद्धतीने बनविले जात असून याला महाराष्ट्रासह, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगना येथे विक्री केली जात आहे. या गुळ कामासाठी  थानिक मजूर मिळत नसल्याने बिहारी रोजगाराना कामाला आणावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. हा व्यवसाय वर्षातील चार महिने चालतो. चार महिन्यात चाळीस लाख रुपयाचे उत्पन्न होते. त्यातून मजुरी, खर्च जाऊन चार महिन्यात दहा लाखाचे उत्पन्न हाती येत असल्याचे  बेलकर यांनी सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image