esakal | Success Story:नांदेडमध्ये पहिल्यांदाच स्ट्रॉबेरीची लागवड, डेरला येथील अर्जुन जाधव यांचा यशस्वी प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

त्या मालाची पहिली तोडणी व विक्रीचा शुभारंभ बुधवारी (ता. १६) करण्यात आला. फळांची
विक्री लिंबगाव रोडवरील विठोबा नैसर्गिक भाजीपाला व शेतमाल विक्री केंद्राद्वारे करण्यात येत आहे.

Success Story:नांदेडमध्ये पहिल्यांदाच स्ट्रॉबेरीची लागवड, डेरला येथील अर्जुन जाधव यांचा यशस्वी प्रयत्न

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे, कृष्णा जोमेगावकर

नांदेड : स्ट्रॉबेरीचे उत्पादन घ्यायच म्हटलं तर महाबळेश्वर या भागाची आठवण येते. परंतु लोहा तालुक्यातील डेरला येथील अर्जुन बालाजी जाधव या
शेतकऱ्याने सेंद्रीय पद्धतीने स्ट्रॉबेरीचे पिक फुलवले आहे. त्या मालाची पहिली तोडणी व विक्रीचा शुभारंभ बुधवारी (ता. १६) करण्यात आला. फळांची
विक्री लिंबगाव रोडवरील विठोबा नैसर्गिक भाजीपाला व शेतमाल विक्री केंद्राद्वारे करण्यात येत आहे.

अर्जुन जाधव यांनी स्ट्रॉबेरीची विंटर डाऊन ही जात निवडली. दहा गुंठे क्षेत्रावर लागवड केलेल्या स्ट्रॉबेरीच्या रोपे वाई पाचगणी येथील रोपवाटिकेतून मागविण्यात आली. यासाठी प्रति रोपांचा खर्च बारा रुपये तर वाहतुकीस दोन रुपये असे एकूण १४ रुपये प्रति रोप खर्च आला. स्ट्रॉबेरीची लागवड चार फूट अंतरावर गादीवाफे तयार करून केली. त्यावर ठिबकसह प्लॅस्टिक मल्चिंग केले. एक फूट अंतरावर एकूण सहा हजार रोपांची लागवड केली. लागवड करण्यापूर्वी पिकाला शेणखत, गांडूळ खत, लिंबोळी पेंड यासह जैविक बुरशीनाशकांचा वापर केला. रोपांची लागवड ता. एक नोव्हेंबर रोजी केली.
सध्या यापासून उत्पादनास सुरुवात झाली आहे. पहिला तोडा अडीच किलोचा मिळाला. येत्या काळात यात वाढ होऊन चांगल्या उत्पादनास सुरवात होईल व नांदेडकरांना सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेली सेंद्रीय स्ट्रॉबेरी मिळेल,असे अर्जुन जाधव यांनी सांगीतले.

हेही वाचा  नांदेड : मोबाईल शाॅपी फोडून, आपली मोबाईल शाॅपी चालविणारी टोळी जेरबंद, लाखोंचा ऐवज जप्त, भाग्यनगर पोलिसांची कारवाई -

नांदेड जिल्ह्यासाठी स्ट्रॉबेरी पीक नवीन असल्यामुळे ते चांगल्या पद्धतीने येईल किंवा नाही याची शाश्वती नसल्याने कमी क्षेत्रावर त्यांनी हा प्रयोग राबवला. यावर्षी या पिकापासून चांगले उत्पादन मिळण्याची आशा असल्याने येत्या काळात यात वाढ करून दीड ते दोन एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केल. संपूर्ण पिकाची सेंद्रिय पद्धतीने जोपासना केली असून कुठल्याही प्रकारचे रासायनिक खते, कीटकनाशके व रासायनिक बुरशीनाशकांचा वापर केला नसल्याने पिकाची प्रत चांगली आहे. पिकावर चांगली चमक गडद लाल रंग येऊन चवही चांगली लागत असल्याने ग्राहकांकडून मागणी होत आहे. या पिकाची पनेट पॅकिंग करून ५० ग्रॅम पासून एक किलो वजन पर्यंतचे पॅकिंग तयार करण्यात येणार आहेत. 

आज या पिकाचे शंभर ग्रॅम प्रमाणे २५ पनेट पॅकेट तयार केले आहेत. त्याची हातोहात विक्री विठोबा नैसर्गिक भाजीपाला व शेतमाल विक्री केंद्रावर श्री बालाजी नेचरल फार्म या नावाने विक्री होत आहे. ग्राहकांकडून चांगली मागणी असल्यामुळे उत्पन्नही चांगले मिळण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. ग्राहकांच्या मागणीनुसार या फळांचा घरपोच पुरवठा केला जणार आहे. तरुण शेतकऱ्याने केलेल्या धाडसाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जीएसटीचे उपायुक्त एकनाथ पावडे, कंधार तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, लोहा तालुका कृषी अधिकारी अरुण घुमनवाड, अमोल बालाजी सावंत, कैलास हनुमंते, सतीश कुलकर्णी, संदीप डाकुलगे, सविता पावडे यांनी कौतुक केले
आहे.

येथे क्लिक कराज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव : डॉ. संजीव बंटेवाड -

विविध पिकात प्रयोग करत असताना स्ट्रॉबेरीची लावगड करण्याची प्रेरणा मिळाली. नांदेडचे वातावरणात चांगली वाढ होत असल्याने आगामी काळात
स्ट्रॉबेरीची लागवड वाढवणार आहे.
- अर्जुन जाधव, शेतकरी, डेरला, ता. लोहा.

नांदेड जिल्ह्यात स्ट्रॉबेरी या फळाची सेंद्रिय पद्धतीने लागवड अर्जुन जाधव या तरुन शेतकऱ्याने केली आहे. या फळपिकांचे स्वास्थ्यासाठी असलेले
चांगले उपयोग होणार असल्यामुळे नांदेडकरांना ताजी स्ट्रॉबेरी संपूर्ण हंगामात मिळेल.
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

loading image
go to top