esakal | Success Story: मन्याड खोऱ्यातील शेख तरन्नुमची देशसेवेसाठी सिमा सुरक्षा दलात निवड

बोलून बातमी शोधा

file photo}

यावेळी कंधार नगर परिषदेचे नगरसेवक विनायक पापीनवार, मन्नान चौधरी, फुलवळ येथील माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य बालाजी देवकांबळे, आनिता बालाजी देवकांबळे, मुन्नी बेगम शेख, रहिम शेख यांनी तिचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

Success Story: मन्याड खोऱ्यातील शेख तरन्नुमची देशसेवेसाठी सिमा सुरक्षा दलात निवड
sakal_logo
By
धोंडीबा बोरगावे

फुलवळ ( जिल्हा नांदेड ) : कंधार तालुक्यातील फुलवळपासून जवळच असलेल्या आंबुलगा येथील शेख पाशामियॉ यांची मुलगी शेख तरन्नूम हिची वयाच्या २० व्या वर्षी B.S.F(बॉर्डर सेक्युरिटी फॉर्स) मध्ये निवड झाल्यामुळे महिला दिनाचे औचित्य साधून तिचा गौरव करण्यात आला. तरन्नुम मन्याड खोऱ्यातील देशसेवेसाठी पहिली युवती ठरली असन तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी कंधार नगर परिषदेचे नगरसेवक विनायक पापीनवार, मन्नान चौधरी, फुलवळ येथील माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य बालाजी देवकांबळे, आनिता बालाजी देवकांबळे, मुन्नी बेगम शेख, रहिम शेख यांनी तिचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

अंबुलगा हे गाव फुलवळपासून तीन कि.मी. अंतरावर असून ग्रामीण भागातील शेख पाशा मिया व त्यांच्या पत्नी यांनी काबाडकष्ट करुन आपल्या सहाही मुलांना लहानपणापासूनच देशसेवा करण्याचे धडे दिले. शेख तरन्नूम हिचे प्राथमीक शिक्षण अंबुलगा येथे झाले. तसेच माध्यमिक शिक्षण अंबुलगा येथे माणिक प्रभू विद्यालय झाले व उच्च माध्यमिक शिक्षण हे श्री शिवाजी कॉलेज कंधार येथे झाले. सैन्यात भरती होण्यासाठी दररोज  मले मेहनत करत असतात त्याच सोबत आता मुलीसुद्धा कमी नाहीत हे अंबुलगा येथे मुलीने सिद्ध करुन दाखवले आहे. घरची परिस्थिती जेमतेम असूनही आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने हे यश मिळविले आहे. 

फुलवळसह परिसरातील युवक आणि युवती मनाशी स्वप्न बाळगून असतात की सरकारी नोकरीवर रुजू व्हाव आणि देशाची सेवा करावी. त्याच परिस्थितीवर मात करुन धाडसाने कंधार तालुक्यातील अंबुलगा गावची कन्या तरन्नूम शेख हिची भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये निवड झाली.

संपादन- प्रल्हाद कांबळे