Success story : उमरीतील इळेगाव येथील तरुण युवा शेतकऱ्याने एकरी ८१ टन ऊस उत्पन्न काढले

प्रल्हाद हिवराळे
Wednesday, 2 December 2020

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील इळेगाव येथील शेतकरी बालाजी रामजी कवळे या युवा शेतकऱ्याने एकरी ८१ टनाचे उत्पादन काढून उमरी तालुक्यात एक वेगळाच आदर्श युवा शेतक-यापुढे  ठेवला आहे. त्यांचे उत्पादन पाहून आता बरेच शेतकरी आपली शेती सुधारण्याचे प्रयत्न युवा शेतकरी सरसावले आहेत.

उमरी (जिल्हा नांदेड) : एकीकडे शेती परवडत नाही अशी ओरड सगळीकडे होत असताना उमरी तालुक्यात मात्र एका शेतकऱ्याने एका एकरामध्ये ८१ टन ऊसाचे उत्पन्न काढले आहे. त्या शेतकऱ्याच्या शेतावर ऊसाचे पीक पाहण्यासाठी अन्य शेतकरी गर्दी करत आहेत. उमरी तालुक्यातील बहुतांश शेतकरी वर्गात आता ऊस हे पिक उत्पन्न घेण्याच्या तयारीत आहेत. 

यापुर्वी शेतक-यावर कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ त्यामूळे शेतकरी आर्थिक बाजूने कोलमडून जायायचे. तसेच या भागात सिंचनाचे जाळे पसरले तर ऊर्ध्व पेंनगंगा प्रकल्प आणि बळेगाव बंधारा तसेच सिंचन विहिरी व बोर झाले. तसा शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळुन ऊस उत्पादनात वाढ होत आहे. 

उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांनी ज्या शेतक-यांनी सिंचनाची सोय करुन घेणार आहेत. अशा शेतक-यांना अल्प दरात कर्ज पुरवठा करुन विधनबोर, सिंचन विहीर, मोटार पाईप लाईन आदीसाठी देत आहेत. एवढेच नाही तर त्यांचा ऊस घेऊन जात असल्याने आता एका एका ऊस उत्पादक शेतक-याच्या खिशात अडीच रुपये प्रति टन भाव प्रमाणे ज्या शेतक-यांचा पाच एकर, दोन एकर, दहा एकर, पंधरा एकर, वीस एकर असे ऊस जर शेतकरी लावत असतील अशा शेतक-याच्या खिशात दहा लाख, पंधरा लाख, वीस लाख, तीस लाख रुपये असे ऊसापोटी आता उत्पन मिळत आहे. त्यामुळे शेतकरी राजकारणापासुन चार हात लांबच दिसत आहेत. त्यात शेतीजोड व्यवसाय दुग्ध व्यवसाय यामध्ये ही पैसा शेतक-याजवळ येत आहे.सध्यातरी ऊस उत्पादक शेतकरी समाधानी दिसतो.

हेही वाचा  नांदेड : एसपी शेवाळेंचा मास्टरस्ट्रोक, दोन टोळीविरुद्ध लावला मोक्का, अन्य टोळ्या वेटिंगवर, गुन्हेगारांचे दणाणले धाबे

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील इळेगाव येथील शेतकरी बालाजी रामजी कवळे या युवा शेतकऱ्याने एकरी ८१ टनाचे उत्पादन काढून उमरी तालुक्यात एक वेगळाच आदर्श युवा शेतक-यापुढे  ठेवला आहे. त्यांचे उत्पादन पाहून आता बरेच शेतकरी आपली शेती सुधारण्याचे प्रयत्न युवा शेतकरी सरसावले आहेत.

कृषी मित्र ऍग्रो सर्व्हिसेस उमरी येथील मार्गदर्शक बालाजी प्रकाश देवके यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यातील शेतकरी सेंद्रीय खते व जिवाणू संजीवके सूक्ष्म अन्नद्रव्ये याचा वापर करुन उसाचे उत्पन्न एकरी शंभर टन कसे काढू शकता हे प्रशिक्षण घेत आहेत. यातच इळेगाव ता. उमरी येथे बालाजी पाटिल कवळे या शेतक-यांनी एकेरी ८१ टन ऊस पिक उत्पन्न काढुन दाखवले हे सिद्ध करुनही दाखवले आहे. गावातील शेतक-यांना सोबत घेऊन अनेक वेळा मार्गदर्शन करुन शेतातील मातीमध्ये शेद्रीय शेती बदल प्रशिक्षण करुन दाखवले आहे. त्यामुळे गावातील रामदास पाटील कवळे,अशोक  कवळे, कैलास कवळे, कोड्जी पाटील कवळे, बळीराम पाटील कवळे, संभाजी पाटील कवळे, शिवाजी पाटील कवळे, गणपती पाटील कवळे, संभाजी कवळे, गणपती कवळे, आक्षय पाटील कवळे अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी सामुहिक गट तयार करुन कृषीमित्र ऐग्रो सेर्विसेस बालाजी देवके यांच्या  मार्गदर्शनाखाली शेती करुन उत्पन्न घेत आहेत. तसे व्हीपीके उद्योग समुहाचे चेअरमन मारोतराव कवळे यांनी इळेगाव येथील युवा शेतकरी बालाजी कवळे व कृषी मिञ मार्गदर्शक बालाजी देवके यांचा सन्मान करुन कौतुक केले. 

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success story: A young farmer from Ilegaon in Umri harvested 81 tons of sugarcane per acre nanded news