Nanded News : ‘इथेनॉल’चे निर्बंध हटविल्याने नांदेड विभागातील साखर कारखाने फायद्यात;गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात २० टक्के वाढ

उसाचा रस किंवा मळीपासून इथेनॉलनिर्म‍ितीवरील निर्बंध केंद्र सरकारने हटविले आहेत. यामुळे देशभरातील साखर उद्योगात आनंदाचे वातावरण आहे. इथेनॉलमुळे सर्वच कारखाने अडचणीत आले होते.
Nanded News
Nanded Newssakal

नांदेड : उसाचा रस किंवा मळीपासून इथेनॉलनिर्म‍ितीवरील निर्बंध केंद्र सरकारने हटविले आहेत. यामुळे देशभरातील साखर उद्योगात आनंदाचे वातावरण आहे. इथेनॉलमुळे सर्वच कारखाने अडचणीत आले होते. नांदेड विभागातील च‍ित्र वेगळे असून, इथेनॉलकडे न वळल्याने येथील कारखाने फायद्यात राहिले आहेत. व‍िशेष म्हणजे यंदा अल्प पावसाने हंगाम ४० दिवसांतच गुंडाळला जाईल, असा अंदाज महसूलकडून व्यक्त करण्यात आला होता. परंतु, ऐनवेळी झालेल्या अवकाळी पावसाने परिस्थ‍िती बदलली.

१६६ दिवस (१५ एप्रिल रोजी धुराडे बंद) गाळप चालले. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी साखरेचे उत्पादन वाढल्याचे समोर आले आहे. नांदेड विभागात हिंगोली, परभणी व लातूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. १ नोव्हेंबर २०२३ पासून जवळपास २९ कारखान्यांच्या गाळपाला सुरवात झाली होती.

या चार जिल्ह्यांत ऊसलागवडीचे क्षेत्र १ लाख ६६ हजार ८५५ हेक्टर इतके आहे. मागीलवर्षी (जून २०२३) मराठवाड्यात नांदेड जिल्हा सोडला, तर इतर जिल्ह्यांत पावसाने ओढ दिल्यामुळे सर्वच पिकांना फटका बसला होता. विशेषत: पाणी कमी झाल्याने उसाचे वजन घटले होते. त्यामुळे सरासरी १० ते १५ टक्के उत्पादन घटणार असून, साखर उताऱ्यावर आणखी परिणाम होऊन गाळपही कमी होण्याची शक्यता प्रादेश‍िक साखर सहसंचालकांकडून वर्तविण्यात आली होती. परंतु, मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस व कारखान्यांनी उसाचा रस इथेनॉलकडे न वळविल्याने साखरेचे उत्पादन वाढले आहे. याशिवाय विभागातील काही कारखान्यांनी गाळपाची क्षमता वाढवून घेतली होती.

गाळपाचा लेखाजोखा

यंदा चार जिल्ह्यांची गाळप क्षमता ९६ हजार २५० मेट्रिक टन असून, प्रत्यक्षात १ कोटी १७ लाख ६५ हजार ९३० मेट्रिक टन गाळप झाले. यातून १ कोटी २० लाख ५८ हजार ५५७ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, एकूण उतारा ९.९८ टक्के इतका आहे. तर गतवर्षीची गाळप क्षमता ८५ हजार ५५० मेट्रिक टन असून, प्रत्यक्षात १ कोटी ५ लाख ६५ हजार ७७८ मेट्रिक टन गाळप झाले. यातून १ कोटी ६ लाख ७९ हजार ६४१ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, एकूण उतारा १०.५ टक्के इतका आहे.

मागीलवर्षीपेक्षा २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे प्रादेश‍िक सहसंचालक (साखर) विभागाकडून सांगण्यात आले. मधल्या काळात झालेला अवकाळी पाऊस उसासाठी पोषक ठरला. वाढ चांगली झाली असून वजनही वाढले आहे. शिवाय गुणवत्ताही चांगली राहिली. त्यामुळे सगळेच अंदाज चुकले. विशेष म्हणजे इथेनॉलनिर्मितीवर निर्बंध असल्याने विभागातील सर्वच कारखान्यांनी सतर्क होऊन साखरनिर्मितीवर भर दिला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी उत्पादन वाढले.

- एस.बी. रावल, प्रादेशिक सहसंचालक (साखर), नांदेड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com