Summer : दिवसभर कडक ऊन, रात्रभर घामाघूम!

गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे तापमानात २ ते ३ अंशांनी घट झाली होती. पण, आता पुन्हा तापमान वाढले आहे.
Summer
Summersakal

नांदेड - गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे तापमानात २ ते ३ अंशांनी घट झाली होती. पण, आता पुन्हा तापमान वाढले आहे. सोमवारी (ता. ३०) शहराचे तापमान ४२.२ अंश होते. किमान तापमानही २८.० अंश असल्याने रात्रही उष्ण होती.

दिवसा तर तीव्र उन्हाचा सामना करावा लागतोच, शिवाय रात्रीही असह्य उकाडा जाणवत असल्याने नागरिक घामाघूम होत आहेत. सकाळपासून तर सायंकाळपर्यंत उन्हाचा चटका असल्याने उष्माघात होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

काळजी घेण्याचे आवाहन

जिल्ह्यात बुधवारी (ता.एक) मे रोजी काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने प्रादेशिक हवामान विभागाकडून जिल्ह्यात ता.३० एप्रिल व ता.एक मे रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उष्माघातासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी व उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

उन्हाचा फटका बसल्यास काय करावे?

 • तहान लागलेली नसली, तरीसुद्धा जास्तीत-जास्त पाणी प्यावे.

 • हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

 • बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/टोपी, बूट व चपलांचा वापर करावा.

 • प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

 • उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा; तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा.

 • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक आदींचा नियमित वापर करावा.

 • अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 • गुरांना छावणीत ठेवावे; तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे.

 • घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा; तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.

 • कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

 • सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे.

 • पहाटे जास्तीत-जास्त कामाचा निपटारा करावा.

 • गरोदर महिला, कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.

उष्माघातामध्ये काय करू नये?

 • लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.

 • दुपारी १२.०० ते ३.३० कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.

 • गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

 • बाहेर तापमान अधिक असल्यास श्रमाची कामे टाळावीत.

 • उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे; तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

उष्णतेचा त्रास कुणाला होतो?

 • उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, निराश्रित, बेघर नागरिक

 • वृद्ध आणि लहान मुले.

 • पुरेशी झोप न झाल्यास.

 • गर्भवती महिला.

 • अनियंत्रित मधुमेह.

 • हृदयरोग असणारे.

 • अपस्मार रुग्ण.

 • दारूचे व्यसन असणारे.

 • विशिष्ट औषधी घेणारे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com