Nanded Crime : 'त्या' सशस्त्र दरोड्यानंतर पोलिसांची कारवाई; सराईत दरोडेखोरांवर 'मोक्का'

लातूर जिल्ह्यात पाच ठिकाणी तसेच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी टोळ्या तयार करून सशस्त्र दरोड्याचे गुन्हे केले.
Crime News
Crime Newsesakal

Nanded Crime : येथे सराईत दरोडेखोरांच्या टोळी विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (१९९९-मोक्का) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीविरुद्ध अशा पद्धतीने कारवाईसाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी तयार केलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर या कायद्यान्वये कलम वाढविण्यात आले आहे.

येथे डी मार्टजवळील अपार्टमेंटमध्ये १५ मे २०२३ ला सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची माहिती गस्तीवरील पोलिसांना समजली होती. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखा, शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अंमलदारांनी दरोडेखोरांचा पाठलाग करून त्यांना काही तासातच मुद्देमालासह ताब्यात घेतले होते.

Crime News
Mumbai : मुंबईत भाजपाचे वाढले बळ! ठाकरेंच्या शिवसेनेसमोर खडतर आव्हान

या गुन्ह्याचा तपास करीत असताना या दरोडेखोरांनी लातूर जिल्ह्यात पाच ठिकाणी तसेच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी टोळी तयार करून सशस्त्र दरोड्याचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर दरोडा, जबरी चोरीसारखे अनेक गंभीर गुन्हे असल्याची माहिती समोर आली होती. लातूर जिल्ह्यातील रेणापूर, गांधी चौक व विवेकानंदचौक तसेच महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत त्यांनी गुन्हे केले आहेत.

Crime News
Nanded : केवळ हलक्या पावसाचा शिडकावा, पेरणीसाठी कर्ज काढून विकत आणलेली बियाणे हे घरात पडून

आर्थिक फायद्यासाठी सशस्त्र दरोड्याचे गुन्हे, जीवे मारणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, घातक हत्याराने जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून सोमय मुंडे यांनी अशा टोळीविरुद्ध ‘मोक्का’ सारख्या कठोर कायद्याप्रमाणे कारवाईबाबत सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने विवेकानंद पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधाकर बावकर यांनी संबंधित दरोडेखोरांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांन्वये कलमाची वाढ करण्याबाबत परवानगी मिळण्यासाठीचा प्रस्ताव पाठविलेला होता. त्याला मंजुरी मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन भातलवंडे, विवेकानंद पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधाकर बावकर, उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, विधी सल्लागार सारिका वायबसे, अंमलदार संतोष खांडेकर, पांडुरंग सगरे आदींनी या कारवाईसाठी पुढाकार घेतला.

Crime News
MUM vs GUJ WPL: हरमनच्या वादळात गुजरातचा पालापाचोळा! मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा ठरला पहिला संघ

कारवाईत या संशयितांचा समावेश

या दरोड्यातील महेश आसाराम चव्हाण (रा. गेवराई), नितीन संजय काळे ऊर्फ बापू टांग्या काळे (रा.अहमदनगर), विकास रामभाऊ भोसले (रा. बीड), रवींद्र संजय काळे (रा. अहमदनगर), लक्ष्मण पांडुरंग भोसले (रा. उमापूर, ता, गेवराई, सध्या फरारी) तसेच एक अल्पवयीन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com