
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना दिली. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी शपथेचे वाचन केले.
नांदेड : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शनिवारी (ता. २५) सकाळी साडेअकरा वाजता येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना दिली. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी शपथेचे वाचन केले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांची उपस्थिती होती.
ता. २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याच्या सूचना प्राप्त झाल्याने १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवीन तरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. राष्ट्रीय मतदार दिवशी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ सर्व मतदारांना दिली जाते. त्याचाच भाग म्हणून शनिवार (ता. २५) जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवसासाठी शपथ घेण्यात आली.
हेही वाचा - कुंडलवाडी नगरपालिकेवर 2016 मध्ये भाजपाची एक हाती सत्ता प्रस्थापित होती
पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी शपथेचे वाचन केले. त्या पाठोपाठ सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी वाचन केले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, प्रभारी पोलिस उपाधीक्षक जगदीश भंडरवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, नियंत्रण कक्षाचे पोलिस निरीक्षक अनंत्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी राजू वटाने, स्थागुशाचे एपीआय पांडुरंग भारती, मुख्यालयाचे शिवाजी पाटील यांच्यासह पोलिस मुख्यालयातील पोलिस अधिकारी, अंमलदार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.