
रामेश्वर काकडे
नांदेड : गेल्या काही वर्षांपासून शहरी व ग्रामीण भागात सावकारीचा अवैध धंदा जोमात सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर येथे महिलेकडे सावकारीचे घबाड सापडल्यानंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीला फक्त २४८ परवानाधारक सावकारांची नोंद आहे.