esakal | माहूर वनपरिक्षेत्रांतर्गत पार्डीत बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

बोलून बातमी शोधा

बिबट्या
माहूर वनपरिक्षेत्रांतर्गत पार्डीत बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
sakal_logo
By
साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड ) : माहूर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या वाई बाजार परिसरातील म. पार्डी शिवारामध्ये बिबट्या मृत अवस्थेत आढळला. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकले नाही. वन विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली आहे.

जंगलांना वणवे लागत असल्याने व नैसर्गिक पाणवठे असल्याने वाई बाजार परिसरात व तसेच पैनगंगा नदी पात्राच्या परिसरातील गाव कुसात हिंस्र वन्यप्राण्यांचा सतत वावर असतो. गुरुवार (ता. २२) रोजी म. पार्डी गावाजवळ मोतीराम जोधा राठोड यांच्या शेतात सकाळी ग्रामस्थ वावरत असताना त्यांना बिबट्या ढेकळात पडून दिसला. जवळ जावून बघितले असता तो मृत असल्याचे आढळून आले.

हेही वाचा - जिंतूरात लसीकरणाचे नियोजन कोलमडले; लसीकरणासाठी गर्दी

याची माहिती वन कर्मचाऱ्यांना देण्यात आली. वन विभागाचे माहूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे पथक म. पार्डी येथे दाखल झाले आहे. सदर बिबट्यावर विष प्रयोग झाले किंवा इतर कारणांमुळे बिबट्याचा मृत्यू झाला हे शवविच्छेदनानंतरच पुढे येईल. माहूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वन परिक्षेत्र अधिकारी श्री. आडे हे त्याचे कर्तव्य नांदेड वरुन पार पडत असल्याने घटनेची चौकशी सुरु झाल्यानंतर देखील उशिरापर्यंत घटनास्थळावर हजर झाले नव्हते. यासंदर्भात वन कर्मचाऱ्यांनी अधिक बोलण्याचे टाळले.

संपादन- प्रल्हाद कांबळे