नांदेड जिल्ह्यातील या सात कृषी सेवा केंद्रावर निलंबनाची टांगती तलवार 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 5 August 2020

गुणनियंत्रण निरीक्षक, पंचायत समिती लोहा यांचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर.  

नांदेड : लोहा तालुक्यातील सात कृषी सेवा केंद्रांनी तपासणीअंती उणिवांची पुर्तता न केल्याने या कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यासाठी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत, असे गुण नियंत्रण निरिक्षक तथा कृषि अधिकारी पंचायत समिती लोहा यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

खरीप हंगामात लोहा तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली आहे. यात त्रुटी आढळल्याने कृषी सेवा केंद्रधारकांना नोटीस देण्यात आल्या होत्या. वारंवार सूचना देवूनही कृषी सेवा केंद्र दुकानदारांनी भावफलक, परवाना दर्शनी ठिकाणी न लावणे, भावफलक अपुर्ण भरणे, उगम  प्रमाणपत्र व प्रिंसिपल सर्टिफिकेट परवान्यात समावेश न करणे, गोदाम परवान्यात समाविष्ट न करणे, सत्यतादर्शक प्रमाणिकरण बियाणांचे प्रमाणपत्र न ठेवणे या उणिवांची पुर्तता न केल्याने लोहा तालुक्यातील सात कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत.

हेही वाचामुखेडमध्ये ५०० खाटांचे तात्पुरते रूग्णालय उभारा, कोण म्हटले ते वाचा...

परवाने निलंबीतच्या प्रस्तावात ही आहेत दुकाने

परवाने निलंबनात  मे. माऊली कृषी सेवा केंद्र, कापसी बु., मे. भाग्यश्री कृषी सेवा केंद्र, सोनखेड, मे. साईबाबा फर्टिलायझर लोहा, मे. ओम साई कृषी    सेवा केंद्र लोहा, मे. बारको कृषी सेवा केंद्र लोहा, मे. न्यु माऊली फर्टिलायझर्स, जुना मोंढा लोहा, मे. बालाजी फर्टिलायझर्स, मेन रोड लोहा यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sword of suspension hanging over these seven agricultural service centers in Nanded district

Tags
टॉपिकस
Topic Tags: