

Suspicion Grows in Syphal Sand Ghat Case After Tehsildar’s Visit, Claim of Staged Action
esakal
माहूर: माहूर तालुक्यातील सायफळ नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दैनिक सकाळ च्या वेब पोर्टलवर सातत्याने बातम्या प्रकाशित झाल्यानंतरच प्रशासनाने हालचाल केली खरी मात्र आधीच अलर्ट जारी करून पाण्यातून ट्रेजर घोटी जेसीबी पोकलेन मशीन नदीपत्रातून बाहेर काढल्यानंतर निर्मनुष्य झालेल्या नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत कारवाईची औपचारिकता पूर्ण करण्यात आली.शेवटी दोन घाटावर वाळू चाळण्याच्या दोन चाळण जप्त करून महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा आपली पाठ थोपाटून घेतली आहे.