esakal | कोरोनाच्या मुकाबल्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे....कोण म्हणाले ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

kendrekar.jpg

सकाळी दहाच्या सुमारास विभागीय आयुक्त डॉ. सुनील केंद्रेकर नांदेडला दाखल झाले. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. 

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे....कोण म्हणाले ते वाचा

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून कोव्हीड रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा सुचना विभागीय आयुक्त डॉ. सुनील केंद्रेकर यांनी प्रशासनाला दिल्या. 
गुरुवारी (ता. सात) डॉ. केंद्रेकर नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली बैठक
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन, विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहीया, पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, जिल्हाशल्य चिकीत्सक डॉ. नीळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन आदी उपस्थित होते. सकाळी दहाच्या सुमारास विभागीय आयुक्त डॉ. सुनील केंद्रेकर नांदेडला दाखल झाले. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. 

हेही वाचा.....दिलासादायक : ‘त्या’ चार पॉझिटीव्हपैकी एक सापडला

सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे
जिल्ह्यात आगामी काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी आरोग्य, महापालिका, पोलिस यासह इतर यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सुचना डॉ. केंद्रेकर यांनी दिल्या. कोव्हीड हॉस्पीटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध ठेवून कोरोनाबाबत लोकांमध्ये भिती निर्माण होवून कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही, याची काळजी घ्या, अशा सुचना डॉ. केंद्रेकर यांनी दिल्या. प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी प्रशासनाच्यावतीने कोरोनाबाबत राबवित असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीनंतर डॉ. सुनील केंद्रेकर गुरुव्दारा परिसरात भेट देवून पाहणी केली. यावेळी डॉ. विपीन, विजयकुमार मगर, डॉ. सुनील लहाने, डॉ. सुरेशसिंह बिसेन आदी उपस्तित होते. 

हेही वाचलेच पाहिजे....खरिपात कापूस लागवड घटणार.....कुठे ते वाचा

जिल्ह्यात कोरोनाचे ३५ रुग्ण
जिल्ह्यात मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्ण ३५ पर्यंत वाढले आहेत. तर चार जनांचा यात मृत्यू झाला आहे. या सोबतच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण फरार असल्यामुळे त्यांचा अद्याप शोध लागला नाही. तसेच एका भागात नागरीकांनी कंटेनमेंट झोन रद्द करण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्रीत आले होते. या पार्श्वभुमीवर विभागीय आयुक्तांच्या भेटीकडे सर्वाचे लक्ष लागले होते.
 

loading image
go to top