केळीच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी शेतीशाळेचा लाभ घ्यावा- अनिल शिरफुले

प्रल्हाद कांबळे
Saturday, 12 September 2020

सरपंच बालाजी जंगीलवाड यांच्या गावातील शेतकरी उपस्थित होते. तालुका कृषि अधिकारी अनिल शिरफुले यांनी हॉर्टसॅप अंतर्गत प्रथम फळपिक शेतीशाळा घेण्यात आली.  

नांदेड :  केळी फळपिकाच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी शेतीशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अर्धापूर तालुका कृषि अधिकारी अनिल शिरफुले यांनी केले.

फळ पिकावरील कीड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत केळी या पिकाची शेतीशाळा अर्धापुर तालुक्यातील चैनापूर येथील गणेश राठोड यांच्या शेतात नुकतीच संपन्न झाली. यावेळी सरपंच बालाजी जंगीलवाड यांच्या गावातील शेतकरी उपस्थित होते. तालुका कृषि अधिकारी अनिल शिरफुले यांनी हॉर्टसॅप अंतर्गत प्रथम फळपिक शेतीशाळा घेण्यात आली.  

निसवलेल्या घडावर बुरशी, काळे ठिपक्याच्या प्रश्नांवर चर्चा

सध्या आढळून येणाऱ्या फळपिकावरील कीड व रोगाबाबत चर्चा करुन उत्पादन व गुणवत्ता सुधारण्याची माहिती देण्यात आली. कृषि पर्यवेक्षक जी. पी. वाघोळे यांनी शेतीशाळेची मूळ संकल्पना सांगून शेतीशाळेची सुरुवात कृषि परिसंस्थेचा अभ्यास करून केली. प्रथम पिकवाढीवर  परिसंस्थेचा जैविक अजैविक, वातावरणीय घटकांचा काय परिणाम होतो या बदलाची निरीक्षणे घेण्यात आली. सोबतच पूर्ण निसवलेल्या घडावर बुरशी, काळे ठिपक्याच्या प्रश्नांवर चर्चा झाली. घड व्यवस्थापण करताना घडावर पिकाचा काडीकचरा, अवशेष राहू नयेत. बाग स्वच्छ ठेवावी.

हेही वाचा -  आरेच्चा नांदेडात पुरुष नसबंदीचा आकडा शोधून सापडेना, महिलांनाच घ्यावा लागतो नसबंदीसाठीही पुढाकार

कृषि सहाय्यक व्ही. एस. केळकर यांनी आभार उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले.

काळी ठिपके रसशोषण करणाऱ्या किडीमुळे झाले असून त्यामुळे गुणवत्ता खराब होते. या परिस्थितीत अ‍ॅसिटामिप्रीड 20 एसपी 0.125 ग्राम किवा व्हर्टीसिलीयम लेकॉनि 3 ग्राम किंवा निमाअर्क (15 हजारपीपीएम) 5 मिली + स्टीकर 1 मिलि / लिटर पाण्यात मिसळून ठराविक अंतराने फवारणी करावी. कांदेबाग लागवड करताना 500 ग्रामच्या आतील नवीन कंद लागवडीस वापरावा. लागवडी पूर्वी कंदप्रक्रिया क्लोरोपायरीफॉस अधिक स्ट्रेप्टोसायक्लीनचा वापर करुन लागवड करावी अशी माहिती दिली. या शेतीशाळेस गावातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. शेवटी कृषि सहाय्यक व्ही. एस. केळकर यांनी आभार उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take advantage of agricultural school for quality banana production- Anil Shirphule nanded news