
नांदेड : शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे; अशोक चव्हाण
नांदेड : ग्रामीण भागात पालकांच्या अनेक समस्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थी शाळेत टिकून कसे राहतील, यासाठी शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. शाळांना इमारती, गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठी शासन स्तरावरून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुले, नरहर कुरुंदकर पुरस्कार व जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी ते रविवारी (ता.२७) बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे महापौर जयश्री पावडे, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, अविनाश घाटे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे, आयुक्त डॉ. सुनील लहाने, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, समाज कल्याण सभापती रामराव नाईक, महिला व बाल विकास समितीच्या सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले उपस्थित होते.
दरम्यान, जिल्ह्यात वाचन चळवळ रुजावी, यासाठी मराठी भाषा दिनाच्या औचित्याने पालकमंत्री अशोक चव्हाण यांची ग्रंथतुला करण्यात आली. शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर कुरुंदकर पुरस्कार श्री. फुलारी आणि फुले पुरस्कार डॉ. मढवई यांना देण्यात आला. प्रत्येकी दोन लाख रुपये, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याच कार्यक्रमात जिल्ह्यातील २०२० आणि २०२१ मधील ६९ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच उप शिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती यांची सहाय्यक शिक्षण संचालकपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार केला. सूत्रसंचालन रविंद्र पांडागळे व व्यंकटेश चौधरी यांनी केले. प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी आभार मानले.
जिल्हा शिक्षक पुरस्कारकर्ते
२०२० च्या जिल्हा शिक्षक पुरस्कार (प्राथमिक विभाग) विकास दिग्रसकर, केशव दादजवार, पद्माकर कुलकर्णी, सदाशिव हात्ते, रमेश पवार, भागवत पाटील, गणेश कदम, मन्मथकृष्ण नायटे, नागोराव चिंतावार, साईनाथ सायबलु, प्रणिता देशमुख, शंकर बेळकोने, प्रवीण नरवाडे, पांडुरंग कोकुलवार, शांताराम जायभाये, मोहन जाधव, (माध्यमिक विभाग) राजाराम कऱ्हाळे, जमील अहमद, पितांबर मिस्तरी, पुरभा बांगाणे, डॉ. बरकत उल्ला, शिवाजी कोंडावार, शंकर इंगळे, गौसिया वडजकर, राजकुमार बेरळीकर, शेख इरफान, मोहन जाधव, बाबू कुलूपवाड यांचा समावेश आहे. तसेच २०२१ च्या पुरस्कारामध्ये (प्राथमिक) व्यंकट गंदपवाड, माधव कल्याणकर, मारोती डोके, विश्वेश्वर वडिले, वसंत लुंगारे, शिवाजी कराळे, शंकर कुद्रे, गणेश कुऱ्हाडे, गंगासागर बिरादार, नागोराव येवतीकर, राजरेड्डी गोपिडवाड, शिवानंद खदगावे, दिगंबर जामगडे, योगेश वैद्य, दिगांबर जगताप, (माध्यमिक) यास्मीन बानु मिर्धा मलंग बेग, जयश्री वागरे, संदीप मस्के, बालाजी उतकर, गोविंद गज्जलवार, अनिता साळुंके, संदीप कमठाणे, ज्ञानोबा फावडे, बाबू शिंदे, रंजना रापतवार, विद्या खानसोळे, शेख खमरोद्दीन गुलाम रसुल, अनिलकुमार येरेकर, (विशेष शिक्षक) परिणिता जयसिंगकार यांचा समावेश आहे.
Web Title: Teacher Should Impart Quality Education Ashok Chavan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..