
गुरुवारी (ता.२१) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी (ता.२२) एक हजार ४५३ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामधील १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
नांदेड - पुढील आठवड्यात पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याचे राज्य सरकाने घोषणा केली आहे. त्यामुळे शाळा सुरु होण्यापूर्वी सर्व शिक्षकांना कोरोना चाचणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही कोरोना चाचणी लॅबवर एकदाच जास्त ताण येत असल्याने व चाचणीची मर्यादा कमी असल्याने शेकडो अहवाल तपासणीविणा पडून असल्याचे समजते.
असे असले तरी कोरोनाचे लक्षण असलेले व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील संशयीतांची शासकीय रुग्णालयामार्फत नियमितपणे कोरोना चाचणी केली जात आहे. गुरुवारी (ता.२१) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी (ता.२२) एक हजार ४५३ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामधील १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दहा दिवसाच्या उपचारा दरम्यान २४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. गंभीर रुग्णांपैकी शुक्रवारी दोघांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा- बालिका खूनप्रकरण : भोकर बंदला विविध संघटनेचा पाठिंबा; पालकमंत्री अशोक चव्हाण कुटुंबाच्या भेटीला
जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ५८२
शुक्रवारी दिवसभरात श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय - पाच, महापालिकेंतर्गत एनआरआय वन व गृह विलगीकरण - आठ, माहूर - दोन, बिलोली- दोन, मुखेड - दोन, किनवट - एक आणि खासगी रुग्णालयातील चार असे २४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली. आतापर्यंत २१ हजार ९९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या लोहा तालुक्यातील भायेगाव येथील पुरुष (वय ६७ ) आणि शिवाजीनगर मुखेड येथील पुरुष (वय ५१) या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ५८२ इतकी झाली आहे.
हेही वाचा- नांदेडमध्ये पेट्रोल विक्रमी ९४ रुपये लिटर; केंद्र सरकारवर नाराजी; सर्वसामान्यांचा खिसा रिकामा
३१५ बाधितावर औषधोपचार सुरु
शुक्रवारी नांदेड वाघाळा महापालीकेच्या हद्दीतील - ११, भोकर- एक, कंधार- एक, मुखेड - एक आणि यवतमाळ एक असे १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या २२ हजार १९९ इतकी झाली आहे. त्यापैकी २१ हजार ९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३१५ बाधितावर औषधोपचार सुरु आहेत. त्यामधील नऊ जणांची प्रकृती अतिगंभीर स्वरुपाची आहे.
नांदेड कोरोना मीटर ः
एकूण कोरोना पॉझिटिव्ह - २२ हजार १९९
एकूण कोरोनामुक्त - २१ हजार ९९
एकूण मृत्यू -५८२
शुक्रवारी पॉझिटिव्ह - १५
शुक्रवारी कोरोनामुक्त - २४
शुक्रवारी मृत्यू - दोन
उपचार सुरु - ३१५
गंभीर रुग्ण - नऊ
स्वॅब तपासणी सुरु - ३९६