esakal | सागवान तस्करांचा महिला वनरक्षकावर हल्ला; आॅनलाईन तक्रारीवरुन किनवटमध्ये गुन्हा 

बोलून बातमी शोधा

file photo}

आपल्याला पोलिस ठाण्यात न्याय मिळेल की नाही या शंकेने सदर कर्मचारी महिलेने चक्क पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे ऑनलाइन तक्रार नोंदविली. या तक्रारीवरुन किनवट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

सागवान तस्करांचा महिला वनरक्षकावर हल्ला; आॅनलाईन तक्रारीवरुन किनवटमध्ये गुन्हा 
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : किनवट तालुक्यातील चिखली बुद्रुक येथील सागवान तस्कर आणि बोधडी वनपरिक्षेत्रातील लिंगदरीच्या जंगला गस्त घालत असलेल्या विद्या बोर्डे या महिला वनरक्षकावर सागवन तस्करांनी हल्ला करुन जीवे मारण्याची धमकी देत तेथून पळ काढला. आपल्याला पोलिस ठाण्यात न्याय मिळेल की नाही या शंकेने सदर कर्मचारी महिलेने चक्क पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे ऑनलाइन तक्रार नोंदविली. या तक्रारीवरुन किनवट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

बोधडी वनपरिक्षेत्रातील लिंगदरी क्षेत्रात वनरक्षक विद्या बोर्डे ह्या दोन मजुरांसह सोमवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास लिंगदरीच्या जंगलात गस्त घालत होत्या. गस्तबाबत सागवान चोरट्यांना याचा सुगावा लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना सदर महिला कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करुन तोडलेले सागवान जंगलात टाकून अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

आरोपीने सतरा सागवानाच्या झाडांची तोड केली होती

वनकर्मचारी महिलेसोबत मनोज खुरसंगे आणि शिवराम राठोड हे वनमजूर असल्याने पुढील अनर्थ टळला. बोधडी वनपरिक्षेत्र कार्यालयात गुन्ह्यांची नोंद करुन सदर महिला कर्मचाऱ्यांनी नांदेडच्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे ऑनलाइन तक्रार नोंदविली. सदर महिला वनरक्षक यांनी सागवान चोरट्यास विचारणा केली असता चिखली बुद्रुक येथील शेख अजीज शेख नजीर, शेख अफरोज शेख कुर्बान, शेख सद्दाम शेख अहमद, शेख मजीद शेख नजीर, शेख जाफर शेख नज्जू अशी त्यांची नावे तक्रारी दिली आहे. आरोपीने सतरा सागवानाच्या झाडांची तोड केल्यावरुन त्यांच्याविरुद्ध गुन्ह्याची तक्रार नोंदविली आहे. 

ऑनलाइन तक्रारीवरुन गुन्हा दाखल 

वनरक्षक महीला कर्मचारी विद्या बोर्डे यांनी ऑनलाईनमध्ये दिलेल्या तक्रारीवरुन चिखली बुद्रुक येथील शेख अजीज शेख नजीर, शेख अफरोज शेख कुर्बान, शेख सद्दाम शेख जाफर, शेख नज्जू यांच्यावर किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.