नांदेडच्या तंत्रस्नेही शिक्षकाने उलगडले सेल्फ स्टडीचे गणिती कोडे... कसे ते वाचा...   | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fail photo

सेल्फ स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी बसून मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने नांदेड येथील गणित शिक्षक सतिश नरंगले यांनी विद्यार्थ्यांसाठी `गणित शिक्षणाचा सेतू' ॲप तयार करून कोरोना संकटामधील सेल्फ स्टडीचे अवघड गणिती कोडे सोडवले आहे. 

नांदेडच्या तंत्रस्नेही शिक्षकाने उलगडले सेल्फ स्टडीचे गणिती कोडे... कसे ते वाचा...  

नांदेड: कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे विशेषतः नववी, दहावीतील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पुर्णपणे भरून काढणे शक्य नसले तरी सेल्फ स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी बसून मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने नांदेड येथील गणित शिक्षक सतिश नरंगले यांनी विद्यार्थ्यांसाठी `गणित शिक्षणाचा सेतू' ॲप तयार करून कोरोना संकटामधील सेल्फ स्टडीचे अवघड गणिती कोडे सोडवले आहे. 

नववी व दहावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वेगळे वळण देणारे वर्ष असते. यावर्षी नेमके याच काळात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आणि सर्वत्र लॉकडाउन झाले. परिणामी शाळा, महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होऊ लागला आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण विभागासह राज्यभरातील अनेक शिक्षकांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन सुरू केले आहे.

सोशल माध्यमातून जवळीक 
गणित अध्यापक मंडळाच्या माध्यमातून नांदेड येथील सतीश नरंगले यांनी  सोशल माध्यमाचा आधार घेत स्टेट बोर्डाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा सेतू निर्माण केला. या सेतूत त्यांनी गणित अभ्यास महामंडळाचे परीक्षा समिती प्रमुख एस. के. बिराजदार (सोलापूर) यांच्या सहकार्याने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गणित शिक्षकांना जोडून घेतले आहे.

हेही वाचाकोरोनावर मात केल्यानंतर प्रथमच नांदेडला अशोक चव्हाण यांचे आगमन


राज्यभरातील शिक्षकही सहभागी 
गणित विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या शिक्षण सेतूत ॲपमध्ये जिल्ह्यासह राज्यभरातील शिक्षकही सहभागी होत आहेत. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकानांही ॲपमध्ये सहभागी करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचा सेल्फस्टडीचा मार्ग आणखीच सुखकर होत आहे. 

फेसबुक, व्हाट्सअप प्रमाणे ग्रुप 
गणित विषयाचा अभ्यास करणाऱ्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाच्या आधारावर एक तासाचे व्हिडीओ लेक्चर तयार करून ते विद्यार्थ्यांपर्यंत फेसबुक व व्हॉटस्अपच्या माध्यमातून पोहोचविले जाईल. विद्यार्थ्यांना फेसबुक ग्रुपवर शिक्षण सेतू नावाने सर्च करून या ग्रुपसोबत जोडता येईल.

येथे क्लिक करा - नांदेड झेडपीच्या कृषी सभापतींनी हाकली तिफण, कुठे ते वाचा..

तीन दिवसांत हजारो सदस्य 
शिक्षण सेतू हा गणित विद्यार्थी व शिक्षकांसाठी फेसबुकवर एप्रिल (ता.१४) रोजी तयार केलेल्या ग्रुपला राज्यभरातील हजारो शिक्षक, विद्यर्थी सहभागी झाले आहेत. 

कोरोना संकटाच्या काळात विद्यार्थ्यांना स्वयंम अध्ययनाची गरज लक्षात घेवून गणित शैक्षणीक सेतू या ॲपच्या माध्यमातून त्यांचा अध्यनाचा मार्ग सोपा केल्याबद्दल शिक्षक सतीश नरंगले यांना शुभेच्छा. ऑनलाइन शिक्षण हा विषय सध्या शहरी भागापुरता मर्यादित आहे. सोशल माध्यमांचा आधार घेत गणित शिक्षणाचा सेतू हे ॲप स्वयंंम अध्ययनासाठी यशस्वी ठरणार आहे. 
- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) 
 

Web Title: Tech Savvy Teacher Nanded Unraveled Mathematical Puzzle Self Study How Read Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nanded
go to top