Nanded Drowning Incident: नांदेड वाजेगाव बंधाऱ्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला
Nanded News: वाजेगाव बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय शेख सोहेल रोख इब्राहिम बुडाल्यानंतर तीन दिवसांनंतर देवापूरजवळ मृतावस्थेत सापडला. अग्निशमन दलाने स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढला.
नांदेड : वाजेगाव बंधाऱ्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह अखेर तिसऱ्या दिवशी रविवारी (ता.५) सकाळी देवापूरजवळ सापडला. शेख सोहेल रोख इब्राहिम (वय १७, रा. जामा मशीद परिसर, वाजेगाव) असे मृताचे नाव आहे.