नांदेडला रविवारी दिलासा; दहा जण कोरोनामुक्त 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

रविवारी (ता.२१) सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण ३५ अहवालापैकी सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. एकही नवीन पॉझिटिव्ह बाधित  आढळून आला नसल्याने‍ जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या ३०४ एवढी कायम आहे.

नांदेड - कोरोना आजारातून रविवारी (ता. २१) दहा व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील सहा व विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील चार असे एकुण दहा व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे. 

नांदेडला आतापर्यंत एकूण २१९ व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. रविवारी (ता.२१) सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण ३५ अहवालापैकी सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. एकही नवीन पॉझिटिव्ह बाधित  आढळून आला नसल्याने‍ जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या ३०४ एवढी कायम आहे.

हेही वाचा-  नांदेडमध्ये लाॅकडाउन काळात दिव्यांगांची थट्टा - कोण म्हणतंय? वाचा

७९ व्यक्तींचे स्वॅब तपासणी सुरु

आतापर्यंत ३०४ बाधितांपैकी २१९ बाधितांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. उर्वरीत ७१ रुग्णांवर औषधोपचार चालू आहेत. यातील चार बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. ५० व ५२ वर्षाच्या दोन स्त्री रुग्ण व ५२ व ५४ वर्षाचे दोन पुरुष यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात ७१ बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १४, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४६, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे पाच बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून सहा बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. रविवार (ता.२१) जून रोजी ७९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सोमवारी (ता. २२) सायंकाळपर्यंत प्राप्त होईल.

हेही वाचा- पावसाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पुन्हा कसली कंबर ​

जिल्ह्याची विषयी माहिती 

सर्वेक्षण- एक लाख ४५ हजार ८३०
घेतलेले स्वॅब- पाच हजार ७०८
निगेटिव्ह स्वॅब- चार हजार ९८५
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- निरंक,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ३०४
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक
मृत्यू संख्या- १४
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- २१९
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ७१
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची ७९ एवढी संख्या आहे.

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten Coroners Released In Nanded On Sunday Nanded News