नांदेड विभागाचा पट्टा पडला; ९४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२०-२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते.
साखर कारखाना
साखर कारखाना

नांदेड ः नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील (Nanded division) गाळप हंगाम ता. चार एप्रील रोजी आटोपला आहे. विभागात गाळप केलेल्या २६ साखर कारखान्यांनी ९४ लाख २८ हजार १८५ टन उसाचे गाळप तर ९३ लाख ९९ हजार २६३ क्विंटल साखरचे उत्पादन केल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या (sugar Co-director) सुत्रांनी दिली.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२०-२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात १८ खासगी तर आठ सहकारी साखर करण्यांचा समावेश होता. विभागाचा गाळप हंगाम ता. ३० ऑक्टोंबर पासून परभणी जिल्ह्यातील रेणुका शुगर या कारखान्यापासून झाला. तर हंगामाचा शेवट ता. चार एप्रील रोजी परभणी जिल्ह्यातीलच बळीराजा साखर कारखान्याचा पट्टा पडून झाला.

हेही वाचा - कोरोनामुळे मृत व्यक्तीवर उपचार सुरु असल्याचा बनाव; मयताच्या पत्नीने न्यायालयात घेतली होती धाव, अखेर रुग्णालयावर फसवणुकीसह आदी कलमान्वये गुन्हा दाखल

विभागातील २६ कारखान्यांनी ९४ लाख २८ हजार १८५ टन उसाचे गाळप तर ९३ लाख ९९ हजार २६३ क्विंटल साखरचे उत्पादन केले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.९७ असल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सुत्रांने दिली.

गाळप, उताऱ्यात ‘बळीराजा’ अव्वल नांदेड विभागात सर्वाधीक गाळप व साखर उताऱ्यात परभणी जिल्ह्यातील बळीराजा साखर कारखाना कानडखेड (ता. पूर्णा) हा खासगी कारखाना अव्वल ठरला आहे. या कारखान्याने हंगाम अखेर सहा लाख ७९ हजार २४६ टन उसाचे गाळप करत सात लाख

७२ हजार ५०८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर या कारखान्याचा साखर उतारा ११.३७ टक्के आला आहे. हा उतारा विभागात सर्वाधीक आहे. यासोबतच गंगाखेड शुगर कारखान्याने चार महिन्यात सहा लाख २८ हजार ५५७ टन उसाचे गाळप करत साखरेचे उत्पादन सहा लाख ४८ हजार ९०० क्विंटल केले आहे.

कारखानानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन

(गाळप टनात साखर उत्पादन क्विंटलमध्ये)

जिल्हा...कारखाने...ऊस गाळप...साखर उत्पादन

नांदेड...सहा...१९,२४,२८९...१८,५५,७७५

लातूर...नऊ...३१, ६७, ८९७...३०, ४१, १९०

परभणी...सहा...२८, १८, ०९५..२८, ८७, ९३८

हिंगोली...पाच...१५, १७, ९०३...१५, ६१, ३६०

एकूण...२६...९४, २८, १८५...९३, ९९, २६३

विभागाचा सरासरी साखर उतारा ९.९७ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com