चांगली बातमी : कोविड हॉस्पिटलमध्येच वाढदिवस; अन् जगण्याची उमेद

कोविड टेस्ट पॉझिटिव्ह ..अख्ख कुटूंब हताश..आपोआप डोळ्यातून धारा..त्यातच ऑक्सिजन लेव्हल कमी झालं ..तर मग काही खरं नाही. असं भयभीत समाजमन..या काळात कोविड हॉस्पिटल वरदान ठरताहेत..खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या एका रुग्णांचा स्वतः..कोविड रोगाचे तज्ज्ञ व या भागात "देवमाणूस '..अशी अनेकांच्या ह्रदयात स्थान मिळविले डॉ. मिलींद धनसडे यांनी रुग्णांचा हॉस्पिटलमध्ये वाढदिवस साजरा केला आणि घाबरलेल्या रुग्णाला जगण्याची उमेद आली.
लोहा फोटो
लोहा फोटो

नांदेड : कोविड टेस्ट पॉझिटिव्ह ..अख्ख कुटूंब हताश..आपोआप डोळ्यातून धारा..त्यातच ऑक्सिजन लेव्हल कमी झालं ..तर मग काही खरं नाही. असं भयभीत समाजमन..या काळात कोविड हॉस्पिटल वरदान ठरताहेत..खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या एका रुग्णांचा स्वतः..कोविड रोगाचे तज्ज्ञ व या भागात "देवमाणूस '..अशी अनेकांच्या ह्रदयात स्थान मिळविले डॉ. मिलींद धनसडे यांनी रुग्णांचा हॉस्पिटलमध्ये वाढदिवस साजरा केला आणि घाबरलेल्या रुग्णाला जगण्याची उमेद आली.

कोविड काळात जेथे जिल्ह्यावरही रुग्ण व नातेवाईक यांची जीवघेणी धावपळ सुरु आहे.. अशा काळात लोह्यात सरकारी कोविड व तीन खाजगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार होताहेत ही धीर देणारी व्यवस्था पाहता लोहा, कंधार, पालम भागातील रुग्णांसाठी लोहा शहर 'मिडिकेअर बनले "आहे..डॉ मिलिंद धनसडे यांनी मागील काळातील कोविड सेवा या भागातील रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी ' जीवदान देणारी ठरली तोच सेवाभाव सद्याही सुरु आहे. पुणे, मुंबई, नांदेड येथून रुग्ण लोह्यात डॉ. धनसडे यांच्याकडे कोरोना उपचार घेत आहेत. साई क्रिटिकलचे प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. राजेश पवार, जगदंबा चे प्रसिद्ध डॉ. गणेश चव्हाण यांचामुळे शहर, आजूबाजूचे दोन तालुके, ग्रामीण भागासाठी मोठी वैद्यकीय सोय झाली आहे. या डॉक्टरांची सरकारी कोविड सेंटरला दररोज सकाळी राउंड असतो त्यामुळे तेथेही मिडिकेअर खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऍड. कपिल बारबिंड ऍडमिट आहेत. ते थोडे कोविड झाला म्हणून घाबरलेत.. डॉ मिलिंद धनसडे यांचे वैद्यकीय समुपदेशन रुग्ण व नातेवाईक याना धीरोदत्तपणे कोरोनाचा मुकाबला करण्याची ताकद देते. तसेच ऍड. कपिल यांच्या बाबतीत झाले.

हेही वाचा - सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे शीख समाजांतर्गत कोविड रुग्णांसाठी विशेष मदत सेवाकेंद्र

शासकीय कोविड हॉस्पिटलमधील जवळपास सव्वाशे रुग्णाची तपासणी करुन आल्यानंतर डॉ. मिलिंद यांनी ऍड. कपिल यांचा हॉस्पिटलमध्येच स्वतः वाढदिवस साजरा केला..तुनही ठणठणीत होणार ..असा विश्वास दिला..हे ऐकताच वकील कपिल यांच्या डोळे पाणावले..आपोआप त्यानी डॉक्टरांचे आभार मानले..या आजाराचे आपण" देवदूत " ..आहात ही कृतज्ञात त्यांनी व्यक्त केली. रुग्णांच्या मनातील भीती दूर करून जगण्याची ताकद देण्याचे काम या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. धनसडे यांनी केले. सगळ्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर त्यांची सर्व सहकारी आपले रुग्ण बरे व्हावेत यासाठी प्रयत्नशील असतात.कोविड रुग्ण सेवेत युवा कार्यकर्ता सचिन मुकदम यांनी स्वतःला वाहून घेतले आहे त्यांची सर्व डॉक्टर व रुग्ण नातेवाईक याना मोठी मदत होते आहेसोबतच असे उपक्रम राबवून रुग्णांत जगण्याची उमेद निर्माण करतात..डॉक्टर व त्यांच्या सहकार्य च्या कार्याला जनतेनी सलाम केला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com