चांगली बातमी : अप्पारावपेठ येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने केली जनावरांच्या पाण्याची सोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अप्पारावपेठ किनवट

चांगली बातमी : अप्पारावपेठ येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने केली जनावरांच्या पाण्याची सोय

शिवणी ( जिल्हा नांदेड ) : किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ (Kinwat Apparaopeth) येथील शेतकरी विनायकराव देशमुख (Vinayak Deshmukh) यांनी आपल्या गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात एक पाण्याचे हौद (Water Tank) तयार करुन या हौदात दररोज पाणी सोडून केली जनावराच्या पाण्याच्या पिण्याची सोय. अप्पारावपेठपासून चार किलोमिटर अंतरावर हा विधायक उपक्रमाचे कौतुक होत आहे. (The good news: Farmers in Apparavpeth have provided water for their animals at their own cost)

सध्या कडक उन्हाळा असल्याने शिवणी अप्पारावपेठ परिसरात जनावरांना पाण्याची व चाऱ्याची वणवण भटकंती करावी लागत आहे. परिसरातील नदी - नाले कोरडेठाक पडले असून हंडाभर पाण्यासाठी कधी- कधी वन- वन करावे लागते. तर जनावरांना पाणी व चाऱ्याची सोय करणे कठीण जात असल्याचे या परिसरातील शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा - हिंगोलीत मोबाईल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात; चार लाखाचे मोबाईल जप्त- पंडित कच्छवेंची कारवाई

अशातच या शेतकर्‍यांनी जनावराची पाण्याची व चाऱ्याची सोय केली. चार एकर शेतीत ज्वारीची पेरणी करुन मजूराअभावी ज्वारीची कापणी न करता हल्लरच्या साह्यानी ज्वारी काढणी केल्याने त्या जमिनीत मोठ्या प्रमाणात चारा मिळत असल्याने या शेतकऱ्यांनी चाऱ्यासोबत पिण्याच्या पाण्याची सोय केली. विशेष म्हणजे या भागात चार तासाची लोडशेडिंग असल्याने या शेतकऱ्यांनी वीज आली की चार किलोमीटरचे अंतर कापून त्या हौदात पाणी सोडण्याचे काम करत आहेत. त्यामुळे जनावरांसाठी चाऱ्याची व पाण्याची सोय झाल्याने या परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Web Title: The Good News Farmers In Apparavpeth Have Provided Water For Their Animals At Their Own

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top