नांदेड जिल्ह्यात 89 केंद्राद्वारे 11 मेअखेर तीन लाख 72 हजार 502 नागरिकांचे लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डाॅ. विपीन, जिल्हाधिकारी, नांदेड.

नांदेड जिल्ह्यात 89 केंद्राद्वारे 11 मेअखेर तीन लाख 72 हजार 502 नागरिकांचे लसीकरण- डाॅ. विपीन

नांदेड : लसीकरणासाठी जनजागृतीनंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिक लसीकरणासाठी (Nanded covisild) पुढे सरसावले आहेत. यात युवा वर्गाचाही मोठा उत्साह दिसून येत आहे. गरजेप्रमाणे जिल्ह्यात लसीकरणाचा पुरवठा सुरळीत (Health department vaccination) व्हावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात असून येत्या काही दिवसात लसीचा पुरवठा सुरळीत होईल असे, प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

Vaccination of 3 lakh 72 thousand 502 citizens by 89 centers in Nanded district by the end of 11th May

ता. 11 मे अखेरपर्यत नांदेड जिल्ह्याला कोविशिल्ड तीन लाख 23 हजार 730 व कोव्हॅक्सीन 96 हजार 440 एवढा डोसेसचा साठा प्राप्त झाला असे एकूण 4 लाख 20 हजार 170 एवढे डोसेस आहेत. दि. 10 मे अखेरपर्यंत जिल्ह्यात एकूण 3 लाख 72 हजार 502 लाभार्थ्यांचे आरोग्य विभागाने लसीकरण यशस्वी करुन दाखविले आहे.

हेही वाचा - देशाप्रमाणेच महाराष्ट्राची अभिमानाची घटना असलेल्या ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांची निवड 140 देश व 12 हजार शिक्षकांच्या नामांकनातून घोषित झाली होती.

लसीकरणासाठी चार गट तयार करण्यात आले आहे. यात हेल्थ केअर वर्कर गटातील 19 हजार 147 व्यक्तींना पहिला डोस तर नऊ हजार 826 व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे यांची एकूण संख्या 28 हजार 973 एवढी होते. फ्रंटलाईन वर्कर गटातील 30 हजार 110 व्यक्तींना पहिला डोस तर नऊ हजार 183 व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. यांची एकूण संख्या 39 हजार 293 एवढी होते. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 21 हजार 658 व्यक्तींना पहिला डोस देण्यात आला आहे. 45 वर्षावरील गटातील दोन लाख 51 हजार 402 व्यक्तींना पहिला डोस तर 31 हजार 176 व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. यांची एकूण संख्या दोन लाख 82 हजार 578 एवढी होते. या चारही गटाची एकूण संख्या तीन लाख 72 हजार 502 एवढी आहे. जिल्ह्यातील उर्वरित लोकांचे लसीकरण अधिक सुरळीत व्हावेत यासाठी आरोग्य विभागाचे नियोजन करत आहे.

मनपा हद्दीत जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना, हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा असे एकूण सहा केंद्रावर कोविशिल्ड लस 18 ते 44 व 45 वर्षावरील लाभार्थी यांच्यासाठी उपलब्ध आहे. शहरी हद्दीत सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय असे एकूण 16 ठिकाणी कोव्हॅक्सीन 45 वर्षावरील लाभार्थी (दुसरा डोस) उपलब्ध आहे. ग्रामीण हद्दीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण 67 ठिकाणी कोविशिल्ड लस 45 वर्षावरील लाभार्थी यांच्यासाठी उपलब्ध आहे.

Web Title: Vaccination Of 3 Lakh 72 Thousand 502 Citizens By 89 Centers In Nanded District By The End Of 11th

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top