
नांदेड : जिल्ह्यातील 45 वय वर्षांवरील नागरिकांसाठी (Nnaded 45 yr old citizens) कोविडशिल्डचा प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोसेस आज गुरुवार (ता. 13) मे रोजीच्या लसीकरणासाठी उपलब्ध झाले आहेत. हे कोविडशिल्डचे डोसेस (Covishild) ज्यांनी पहिल्यांदा घेतले आहेत व जे दुसऱ्या डोससाठी वाट पाहत आहेत अशा प्रत्येकी 100 व्यक्तींना (100 people) प्रत्येक केंद्रनिहाय देण्याचे नियोजन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे.
(The second dose of Covidshield is only for beneficiaries above 45 years of age in Nanded today)
लसीकरण केंद्रावर 18 ते 45 वयोगटातील युवक- नागरिकांनी गर्दी न करता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.
हेही वाचा - रमजान ईदमुळे दुधाच्या भावाने उसळी
नांदेड शहरात पुढीलप्रमाणे लसीकरण केंद्र आहेत. यात श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा असे एकूण 7 केंद्र आहेत. शहरी हद्दीत सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय असे एकूण 16 केंद्र आहेत.
ग्रामीण हद्दीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु असून एकूण 67 केंद्र आहेत. या प्रत्येक केंद्रावर आजच्यासाठी कोविडशिल्ड या लसीचे 100 डोस उपलब्ध मिळाले आहेत. लसीकरणाच्या या मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे. नांदेड जिल्ह्यात 11 मे पर्यंत एकुण 3 लाख 78 हजार 166 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.