esakal | रमजान ईदमुळे दुधाच्या दरांत उसळी; तरीही मागणीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

milk

रमजान ईदमुळे दुधाच्या दरांत उसळी; तरीही मागणीत वाढ

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : रमजान ईदमुळे (ramadan) दुधाच्या भावाने (milk rates) उसळी घेतली आहे. लिटरमागे १० ते १५ रुपये दर वाढले आहेत. सध्या ७० रुपये लिटरने दूध विक्री होत आहे. काही दिवसांपूर्वी रमजान पर्वास सुरवात होताच दुधाचे दर काही प्रमाणात वाढले होते. सकाळी सहेरी आणि सायंकाळी इफ्तारच्या दरम्यान दुधाचे विविध पदार्थ तसेच शरबत बनविण्यासाठी दुधाचा वापर केला जातो. त्या अनुषंगाने रमजान पर्वत दुधाची मागणी वाढत असते. (milk rates high in ramadan festival)

हेही वाचा: निफाडच्या बहिणीला मालेगावच्या भावाचा आधार! संकटकाळात जपली माणुसकी

शीरखुर्म्यासाठी दुधाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर

महिनाभराच्या रोजाची सांगता रमजान ईदच्या दिवशी शीरखुर्मा सेवन करून केली जाते. शीरखुर्म्यासाठी दुधाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासत असते. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ईदनिमित्ताने व्यावसायिकांनी दुधाच्या भावामध्ये सुमारे १० ते १५ रुपयांनी वाढ केली आहे. काही दिवसांपूर्वी ५५ ते ६० रुपये प्रतिलिटर दुधाची विक्री केली जात होती. दोन दिवसांपासून ७० रुपये लिटरने विक्री होत आहे. नागरिकांमध्ये वाढत्या दरास घेऊन काहीशी नाराजी आहे. असे असले तरी दुधाची आवश्यकता असल्याने नागरिकांकडून दूध खरेदी केले जात आहे. ईदच्या पूर्वसंध्येला तसेच ईदच्या दिवशी ८० ते ९० रुपये लिटर दुधाचे दर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुकानासाठी परवानगी द्यावी

दूध विक्री अत्यावश्यक सेवेत आहे. रमजान ईदच्या निमित्ताने दुधाची मागणी वाढत असते. असे असताना प्रशासनाकडून दूधविक्री दुकान लावण्यास बंदी केली आहे. केवळ घरपोच सेवा देण्याची परवानगी दिली आहे. प्रत्येक व्यावसायिकास घरपोच दूध देण्यास जाणे शक्य नाही. अशा वेळेस मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच नागरिकांनादेखील दुधापासून वंचित राहावे लागू नये. यासाठी दूध विक्री दुकान लावण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.