नांदेडमध्ये पुरेसे बेड उपलब्ध असून रुग्णांनी घाबरून जाऊ नये - जिल्हाधिकारी डॉ. विपीन 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड - शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी नांदेडमध्ये शासकीय कोवीड उपचार रूग्णालयात बेड उपलब्ध नाहीत, अशा अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे मी आज शुक्रवारी स्वत: या रूग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या रूग्णालयात पुरेसे बेड त्याचबरोबर आवश्यक ती सर्व औषधे उपलब्ध असून नागरिकांनी तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी घाबरण्याचे कारण नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने हेही येथेच उपचार घेत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी फेसबुकवर देखील ही माहिती त्याचबरोबर काही छायाचित्रेही दिली आहेत. डॉ. विपीन म्हणाले की, आजच्या पाहणीत एक बाब माझ्या निदर्शनास अशी आली की काहीजण डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणून त्यांना आवश्यकता नसतानाही या रूग्णालयात ॲडमिट होत आहेत. अशांनी बेड अडवून ठेवल्यास ज्यांना आवश्यकता आहे त्यांना बेड उपलब्ध होणार नाहीत. आज मी प्रत्यक्ष पाहणी करून बेड अडवून ठेवलेल्या दहा ते बारा जणांना रूग्णालयातून सुटी देऊन घरी पाठवले आहे. त्यांच्यावर सहजपणे घरी उपचार केले जाऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

लक्षणे आढळली की कोरोना चाचणी करा
पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यातील नागरीकांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आवाहन केले आहे. आजार लपवू नका. सौम्य लक्षणे आढळली तरी कोरोना टेस्ट करून घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विलगीकरणात राहून उपचार करवून घ्या. आवश्यकता असल्यास आपल्याला रूग्णालयात दाखल करून घेऊन उपचार केले जातील. अनावश्यक काळजी करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

नागरिकांनी देखील काळजी घ्यावी
कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. नागरिकांनी देखील काळजी घ्यावी. सुरक्षित रहा आणि विनाकारण घराबाहेर पडू नका. कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणे, इतरांपासून शारिरीक अंतर राखणे आणि सतत सॅनिटायजरचा वापर करणे अत्यावश्यक आहे. 
-डॉ. विपीन, जिल्हाधिकारी, नांदेड.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com