esakal | नांदेडच्या या काँग्रेस आमदारांना कोरोनाची लागन, मुलगीही झाली बाधीत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आमदार अॅन्टीजेन रॅपीड टेस्टमध्ये पाॅझिटिव्ह आले असून त्यांची दहा वर्षाची बालिकाही कोरोनाबाधीत असल्याचे तपासणीत पुढे आहे.

नांदेडच्या या काँग्रेस आमदारांना कोरोनाची लागन, मुलगीही झाली बाधीत

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड :  जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे अत्ंयत निकटवर्तीय व विश्वासु समजले जाणारे आमदार अॅन्टीजेन रॅपीड टेस्टमध्ये पाॅझिटिव्ह आले असून त्यांची दहा वर्षाची बालिकाही कोरोनाबाधीत असल्याचे तपासणीत पुढे आहे. मात्र त्यांची पत्नी आणि मुलगा हे दोघेजण निगेटीव्ह आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
शहराच्या शिवाजीनगर भागात राहणारे आमदार पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या जवळचे समजले जाणारे विधान परिषद सदस्य व त्यांच्या या मुलीला कोरोणाची बाधा झाल्याचे विविध सामाजिक माध्यमातून पुढे येत आहे. प्रशासकीय स्तरावर मात्र या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा मिळाला नसला तरी आमदार यांच्या मित्रमंडळीकडून सोशल मीडियावर त्यांच्या आरोग्याबाबत संदेश प्रसारित करण्यात येत आहेत. दोन महिन्यापूर्वी पालकमंत्री अशोक चव्हाण हे कोरोनाग्रस्त झाले होते. त्यांच्यावर मुंबई येथे उपचारानंतर ते ज्या दिवशी नांदेडला परतले त्याच दिवशी नांदेड दक्षिणच्या आमदारांसह त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधीत झाले होते. त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार करून ते आपल्या मतदार संघात कामाला लागले. त्यांनी पुन्हा आपल्या मतदार  संघात काम सुरू केले आहे.

हेही वाचालेंडी प्रकल्पाचे खरे जनक देवेंद्र फडणवीस- कोण म्हणाले वाचा...?

अधिकारी व पत्रकारांच्या अडचणीत भर

दरम्यानच्या मधल्या काळात माजी महापौर व त्यांचे नगरसेवक पुत्र त्यानंतर उपमहापौर हे पॉझिटिव्ह आले होते. या सर्वांनी कोरोनाशी झुंज देत विजय मिळविला. काँग्रेसचे अनेक पुढारी कोरोनाग्रस्त होत असल्याने जनतेच्या कल्याणासाठी फिल्डवर उतरलेले काँग्रेसचे पुढारी पॉझिटिव होत असल्याचे सांगून लवकरच ते बरे होतील असे पत्रक बाधीत झालेल्या आमदारांनी काढले होते. आता खुद्द तेच कोरोना बाधीत झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीस या आमदारांनी उपस्थिती लावली होती. तसेच दोन दिवसापूर्वी पत्रकारांचे शिष्टमंडळ पालकमंत्री अशोक चव्हाण यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी बाधीत झालेले आमदार तेथे उपस्थित होते. त्यामुळे काही अधिकारी व पत्रकारांच्या अडचणीत भर पडल्याचे बोलल्या जाते. या सर्व मंडळीना आता क्वारंटाईन व्हावे लागणार की असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

पावडेवाडी नाका परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु

बाधीत आमदारांची पत्नी आणि डाॅ. मुलगा हा अॅन्टीजेन टेस्ट तपासणीत निगेटीव्ह आले असून त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. बाधीत आमदार व त्यांची कन्या हे दोघेजण सध्या पावडेवाडी नाका परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दोघांचा अहवाल सायंकाळी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयाकडून अधिकृत मिळणार असल्याचे सांगण्यात आले. पुन्हा एकदा शिवाजीनगर परिसर कन्टेनमेन्ट झोन होणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

loading image
go to top