या सदस्यांनी केली मुख्यमंत्री सहायता निधीस लाखाची मदत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

शहरातील सोने चांदीचे सराफा व्यापारी तथा विविध सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे ज्येष्ठ समाजसेवक सुधाकर टाक धानोरकर यांच्या पुढाकारातून संस्था, समिती आणि संघटनेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्यात आली आहे.  

नांदेड : रयत रुग्णालयाच्या आरोग्य मंडळाच्या उपाध्यक्षपदी सुधाकर टाक हे कार्यरत आहेत. त्यांनी व रयतच्या सदस्यांनी मिळून गुरुवारी (ता. चार) मुख्यमंत्री सहायता निधीस दिला. एक लाख ११ हजारांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला आहे.

यापूर्वी देखील श्री. टाक यांच्या पुढाकाराने श्री संत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रम व सराफा असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख रुपयांपेक्षा अधिकचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविला आहे. त्यानंतर गुरुवारी तिसऱ्यांदा श्री. टाक यांनी पुढाकार घेत रयत रुग्णालय सदस्य मंडळामार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख ११ हजारांची मदत केल्याने त्यांचे कौतूक होत आहे. यावेळी त्यांच्यासोबत रयत मंडळाचे सदस्य बापूराव गजभारे उपस्थित होते. 

हेही वाचा-  Corona Breaking ः आज पुन्हा सात पॉझिटिव्ह,  तीनच दिवसात ३७ रुग्णांची भर ​

सरकारच्या तिजोरीवर ताण कमी करण्याचा प्रयत्न
राज्याची राजधानी असलेल्या मुंबई आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढत आहेत. कोरोनाच्या या संकटाचा सामना करत असलेल्या राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत आहे. अशा स्थितीत सरकार मोठ्या हिंमतीने कोरोनाचा मुकाबला करताना सामान्य जनतेच्या आरोग्यास प्राधान्य देऊन सर्व त्या उपायोजना करताना दिसून येत आहे. 

हेही वाचा-  Video - कोरोनाच्या संकटातही पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना ​

मुख्यमंत्री सहायता निधीस मदत 

अशा कठीण प्रसंगी सरकारच्या मदतीला धावून जाणे, हे माणुसकीचे दर्शनच म्हणावे लागेल, विशेष म्हणजे सरकार अडचणीत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जमेल त्या पद्धतीने मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे यापूर्वीच जनतेला आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनास जनतेनी प्रतिसाद देत जमेल, तशी मदत केली आहे. परंतु ही मदत तोकडी पडत असल्याने पुन्हा काही संस्था, संघटना मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्यासाठी धावून येत आहेत. 

मुक्तेश्वर आश्रमाच्या माध्यमातून समाजसेवा 
पैसे कमविण्यासाठी उभे आयुष्य पडले आहेत. परंतु या आधी राज्य सरकारला संकटात अर्थिक मदत करणे या सारखी दुसरी राष्ट्रभक्ती असूच शकत नाही. मागील अनेक वर्षापासून श्री संत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रमाच्या माध्यमातून जमेल त्या पद्धतीने समाजसेवा करण्याचा प्रयत्न असतो. गरजवंत, अनाथ मुला मुलींचे लग्न सोहळे घेतो. यावर्षी कोरोनामुळे लग्न सोहळे होऊ शकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीस सर्वांच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचा हा प्रयत्न आहे.
- सुधाकर टाक धानोरकर, व्यापारी. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These Members Donated Lakhs To The Chief Minister's Assistance Fund Nanded News