esakal | विधिमंडळ समित्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील या आमदारांना वगळले
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आमदार निवास समितीच्या अध्यक्ष पदाची धुरा टाकली आहे. तर दोन आमदारांची निवड दोन वेगवेगळ्या समितीवर झाली आहे. 

विधिमंडळ समित्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील या आमदारांना वगळले

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्याच्या विधीमंडळाच्या समितीच्या अखेर निवडी करण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व आमदारांची या समित्यांवर वर्णी लागली मात्र नायगावचे आमदार राजेश पवार यांना मात्र स्थान मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरु असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आमदार निवास समितीच्या अध्यक्ष पदाची धुरा टाकली आहे. तर दोन आमदारांची निवड दोन वेगवेगळ्या समितीवर झाली आहे. 

चालू आर्थिक वर्षातील विधानमंडळ समित्यांवर नांदेड जिल्ह्यातील आमदारांची विधानसभा सभापती यांनी नियुक्त्या केल्या आहेत. सभापतींनी तीन नोव्हेंबर रोजी विविध समित्यांच्या सदस्य व प्रमुखांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यात देगलुरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर आणि हदगावचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर या काँग्रेसच्या दोन्ही आमदारांना दोन समित्यांच्या सदस्यपदी संधी मिळाली आहे. त्यामुळे त्या समितीवर राहून आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी ते प्रयत्न करणार आहे. 

हेही वाचानांदेडकरांना दिलासा : कोरोनावर नियंत्रण, मात्र सावधानता बाळगणे आवश्यक -

आमदार राजेश पवार समिती निवडीत वंचीत

जाहीर केलेल्या समित्यांच्या यादीमध्ये नायगावचे भाजपचे आमदार राजेश पवार यांचे नाव मात्र नाही. संयुक्त समित्यांमध्ये रणजीत कांबळे (अंदाज समिती), सुधीर मुनगंटीवार (लोक लेखा समिती), अॅड. अशोक पवार (सार्वजनिक उपक्रम), डॉ. संजय रायमुलकर (पंचायत राज), मनोहर चंद्रिकापुरे (रोहयो) , आशिष जयस्वाल (उप विधान समिती), प्रणिती शिंदे (अनुसूचित जाती कल्याण), दौलत दरोडा (अनुसूचित जमाती कल्याण), शांताराम मोरे (विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण), सरोज अहिरे (महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण), मंगेश कुडाळकर (इतर मागास वर्ग कल्याण), अमीन पटेल (अल्पसंख्यांक कल्याण), चेतन तुपे (मराठी भाषा), नरेंद्र भोंडेकर (अशासकीय विधेयके व ठराव) यांची निवड करण्यात आली. 

येथे क्लिक करानांदेड : रब्बीसाठी विद्यूतप्रणालीची देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करा- मुख्य अभियंता पडळकर -

बालाजी कल्याणकर यांना आश्वासन समिती

तसेच अधिनियमानुसार संयुक्त समित्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (सदस्यांचे वेतन व भत्ते, विधान मंडळ माजी सदस्यांचे निवृत्तीवेतन), सभापती रामराजे नाईक निंबाळकर (ग्रंथालय तसेच वातावरणीय बदल या संदर्भातील संयुक्त समिती), बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (आमदार निवास व्यवस्था), राजन साळवी (आहार व्यवस्था), राज्यमंत्री आदित्य ठाकरे (धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी), नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांची (सार्वजनिक उपक्रम समिती), नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची (आश्वासन समिती), हादगावचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची (पंचायत राज आणि आमदार निवास व्यवस्था समिती), आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचेवर (विधान समिती व शासकीय विधेयके तसेच ठराव समिती), मुखेडचे आमदार तुषार राठोड, आमदार भीमराव केराम यांची (अनुसूचित जमाती कल्याण समिती) तसेच कंधारचे आमदार शामसुंदर शिंदे यांची अ(शासकीय विधेयके व ठराव समिती) सदस्य पदी नियुक्ती झाली आहे.