
विशेष म्हणजे ही सर्व दुकाने भरवस्तीमध्ये राष्ट्रीय महामार्गावर आहेत. पोलिसांचा फिक्स पाॅइंट जवळच आहे. या परिसरातील दुकानात वारंवार चोरीच्या घटना घडल्या असून अद्याप एकही चोरी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले नाही. शहरात चोरी, दुचाकी चोरी, भामटेगिरी करून लुबाडणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या घटनेप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : अर्धापूर- नांदेड रस्त्यावरील एकाच रात्रीत एकाच रांगेतील चार दुकाने, भाऊराव सहकारी साखर कारखाण्याचे संपर्क कार्यालय व एका माध्यमाचे कार्यालय फोडून सुमारे पावने दोन लाखांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना रविवारी (ता. एक) सकाळी उघडकीस आली आहे. आज्ञात चोरट्यांनी शनिवारी (ता ३१) मध्यरात्रीनंतर एकाच पध्दतीने दुकानाचे शटरवाकून काऊंटर व कपाटामधील रोख रक्कम लंपास केली आहे. विशेष म्हणजे ही सर्व दुकाने भरवस्तीमध्ये राष्ट्रीय महामार्गावर आहेत. पोलिसांचा फिक्स पाॅइंट जवळच आहे. या परिसरातील दुकानात वारंवार चोरीच्या घटना घडल्या असून अद्याप एकही चोरी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले नाही. शहरात चोरी, दुचाकी चोरी, भामटेगिरी करून लुबाडणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या घटनेप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की अर्धापूर- नांदेड रस्त्यावर बालाजी मोटरवार यांचे बालाजी ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. त्यांनी दिवसभर व्यापार करून दुकान बंद केले. दिवसभर व्यापारातून व इतर जमा रक्कम दुकाणातील कपाटात ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. दुकानातील कपाट फोडून कपाटातील सुमारे दिडलाखाची रोख रक्कम लंपास केली. तसेच कपाटातील कागदपत्रांची नासधूस केली.
एकाच रात्री सहा दुकाने फोडली
याच दुकानाच्या शेजारी गंगाधर राऊत यांचे जयवंत ट्रेडिंग कंपनी हे ठिबकसंचन विक्रीचे दुकान आहे. दुकानाचे शटरवाकून दुकानात प्रवेश केला दोन हजार २५० रूपये लंपास केले. तर याच दुकानाच्या शेजारी गंगाधर सिनगारे यांचे मारोती मशनरी हे दुकान आहे. या दुकानातील तीन हजार लंपास केले. तर संतोष तिडके यांच्या दुकानातील सहा हजार लंपास केले.
हेही वाचा - हिंगोली : दुचाकी- कंटेनरअपघातात एकाचा मृत्यू
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालय फोडले
ही चार दुकाने फोडल्यानंतर चोरट्यांनी याच भागातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयाचे कुलुप तोडले. तर पत्रकार उदय गुंजकर यांचे संपर्क कार्यालय फोडून वीस हजार लंपास केले आहेत. टनेचे गांभीर्य लक्षात घेवून चोरीचा माग काढण्यासाठी नांदेड येथील श्वानपथकाला व ठसे तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने चोरीच्या ठिकाणी व परिसरात तपास केला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब देशमुख, पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. टी. नांदगावकर, पोलिस उपनिरिक्षक बळीराम राढोड यांनी भेट देवून घटनेची माहिती घेतली व तपासासंबंधी सुचना केल्या.
व्यावसायिकांना लुटने विविध मार्गांनी लुबाडणूक
शहरात दुचाकी चोरी, दूकान फोडने, सराफी व्यावसायिकांना लुटने विविध मार्गांनी लुबाडणूक करणे अशा अनेक घटना अलीकडच्या काळात झाल्या आहेत. तक्रार दाखल करणे, पंचनामा करणे व तपास चालू आहे हे नित्याचेच झाले आहे. पोलिसांची गस्त, फिक्स पाॅइंट असतात मात्र चोरीच्या घटना धांबत नाहीत, व त्याचा तपासही लागत नाही अशा नागरिक, व्यापारी यांच्या प्रतिक्रिया आहेत.
येथे क्लिक करा - कोरोनात सर्व थांबले...मात्र शेतकऱ्यांच्या शेतीने रोजगाराला तारले -
चोरट्यांना लवकरच जेरबंद करू- पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे
शहरात होणा-या चोरीच्या घटना, मारामारीच्या घटना यावर आळा बसावा व तपास कामात मदत व्हावी यासाठी सुरक्षित शहर योजने अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी सिसिटिव्ही लावण्याचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाने नगरपंचायत कार्यालयाला पाठविला आहे. हा प्रस्ताव गेल्या सहा वर्षांपासुन धुळखात पडून आहे. या प्रस्तावाबाबत नगरपंचायत केव्हा गांभीर्याने विचार करणार आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून तपासा संदर्भात योग्य त्या सुचना केल्या आहेत. चोरट्यांना लवकरच जेरबंद करू अशी प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांनी दिली.
संपादन- प्रल्हाद कांबळे