लॉकडाउनचा तिसरा बळी : नांदेडच्या सांगवी परिसरातील घटना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

ही घटना सांगवी परिसरातील अंबानगरमध्ये बुधवारी (ता. तिन) दुपारी चारच्या सुमारास घडली. जिल्ह्यातील लॉकडाउनचा हा तिसरा बळी असल्याचे बोलल्या जात आहे. 

नांदेड : लॉकडाउनमध्ये हातचे काम गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. या आर्थीक संकटातून कसे सावरावे या विवंचनेत सापडलेल्या एका ३९ वर्षीय व्यक्तीने खचुन आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सांगवी परिसरातील अंबानगरमध्ये बुधवारी (ता. तिन) दुपारी चारच्या सुमारास घडली. जिल्ह्यातील लॉकडाउनचा हा तिसरा बळी असल्याचे बोलल्या जात आहे. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखावा यासाठी संबंध जगभरात लॉकडाउन सुरू आहे. त्यात भारतातही पाचवे लॉकडाउन सुरू करण्यात आले आहे. या लॉकडाउनमध्ये हातावर पोट असणाऱ्यांना सर्वाधीक फटका बसला आहे. उद्योग व कामे बंद झाल्याने कामगारांचे हात रिकामे झाले. रोज काम करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली. अनेक जण कामाच्या शोधात आहेत. परंतु सर्वच ठिकाणी उद्योग- व्यवसाय बंद पडल्याने कामगारांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

अशाच एका घटनेतून सांगवी परिसरात असलेल्या जेसीबी चालक अंबानगर येथील माधव उकंडी खिल्लारे (वय ३९) याने मागील दोन महिण्यापासून हाताला काम नसल्याने घरगाडा कसा चालवायचा या विवंचनेत तो सापडला. या दुहेरी संकटाचा सामना करु शकला नाही. शेवटी त्याने बुधवारी (ता. तिन) दुपारी चारच्या सुमारास आपल्या राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती दत्ता खिल्लारे याने विमानतळ पोलिसांना दिली.

 हेही वाचा -​ Video : रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी गुणकारी ​

विमानतळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद 

यावरून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह विष्णूपुरी शासकिय रुग्णालयात दाखल केला. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर त्याच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दत्ता उकंडी खिल्लारे याच्या माहितीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक श्री. गोवाडे करत आहेत. 

 हेही वाचा -​ एक लाख ८० हजार क्विंटल धान्य खरेदी....कुठे ते वाचा​

जिल्ह्यातील लॉकडाउनचा तिसरा बळी
 

लॉकडाउनमध्ये जिल्ह्यात मागील महिण्यात भूकबळीने हदगाव तालुक्यातील एकाने आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतांनाच पुन्हा माळाकोळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उपचार घेण्यासाठी व प्रपंच चालविण्यासाठी एका महिलेनी आत्महत्या केली होती. या दोन घटनांनी जिल्हा हळहळत असतांना पुन्हा हातावर पोट असलेल्या नांदेड शहराच्या सांगवी परिसरातील अंबानगर येथील जेसीबी चालक माधव खिल्लारे याने बुधवारी (ता. तिन) गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्हा यापूर्वी शेतकरी आत्महत्येच्या घटनांनी ओळखला जात होता. आता हाताला काम नसलेल्या कामगारांनी आत्महत्या करण्याचा सपाटा सुरू केल्याचे दिसुन येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Third Victim of Lockdown: Incident in Sangvi Area of ​​Nanded, nanded news