पोहण्यासाठी गेलेल्या तीन बालकांचा पाण्यात बुडुन मूत्यु..कुठे घडली दुर्दैवी घटना? वाचा...

विठ्ठल लिंगपूजे
Tuesday, 28 July 2020

अतिदुर्गम भागातील चिखली (ता. किनवट) येथील घटना, चिखली गावावर शोककळा, परिसरात हळहळ.

ईस्लापुर (ता. किनवट, जिल्हा नांदेड) : पोहण्यासाठी गावाशिवारात गेलेल्या तीन बालकांचा पाण्यात बुडबून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अतिदुर्गम भागातील चिखली (ता. किनवट) येथील एका नाल्यात मंगळवारी (ता. २८) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. इस्लापूर पोलिसांनी पंचनामा करुन बालमृतदेह पाण्याबाहेर काढले. मात्र यातील एका बालकाचा रुग्णालयात नेतांना वाटेतच मृत्यू झाला. 

शिवणी (ता. किनवट) परिसरातील अतिदुर्गम भागातील तेलंगाणा राज्याच्या सिमेलगत असलेल्या चिखली येथील गंगाधर लक्ष्मण भंडारवाड (वय १३), इयरितेश विठल देशटीवार (वय १०), श्रीकर गोपाल नागुवाड (वय १४) हे तीन्ही बालके एकत्र मिळुन कंचलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गावालगत असलेल्या नाल्यात पोहण्यासाठी गेले. मागील काही दिवसांपासून या भागात चांगला पाऊस पडत असल्याने नदी नाले, ओढ्यांना पूर आला. शेतातील शेततळे पाण्याने भरुन वाहत आहेत. अशाच एका नाल्यात पोहण्यासाठी हे बालके गेली. परंतु त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघांचा जागीच मूत्यु झाला.

हेही वाचा -  दुचाकी चोरट्यांकडून सहा दुचाकीसह साडेतीन लाखाचा ऐवज जप्त- नांदेड पोलिस

आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

या घटने बाबत गावकऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ या नाल्याकडे धाव घेतली. यावेळी श्रीकर नागुवाड हे जिवंत असल्याने त्यास
बाहेर काढुन उपचारासाठी शिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंन्द्राकडे आणतांना त्याचा देखील रस्त्यातच मूत्यु झाला. या घटनेची माहीती ईस्लापुर पोलीसांना मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे आणि त्यांचे सहकारी श्रीकिशन कांदे, कर्मचारी संदीप साळवे यांनी घटनास्थळी धाव घेवुन गावकऱ्याच्या मदतीने सदरील बालकांना बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी शिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंन्द्रात आणले. प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकिय अधिकारी के. एस. मुंडे यांनी शवविच्छेदन केले. या घडलेल्या घटनेने चिखली गावासह परिसरात शोककळा पसरली. या प्रकरणी रात्री उशिरा इस्लापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three children drowned after going for a swim nanded news