गुरुवारी अडीचशे जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; दिवसभरात एकाचा मृत्यू, ८३ रुग्ण कोरोनामुक्त 

file Photo
file Photo

नांदेड - मागील तीन महिन्यातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या गुरुवारी (ता. ११) प्राप्त झालेल्या अहवालातुन पुढे आली आहे. त्याचबरोबर ८३ रुग्ण औषधोपचारानंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

बुधवारी तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी गुरुवारी (ता. ११) एक हजार ५६० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार २५३ निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या २५ हजार ४४० एवढी झाली असून, यातील २३ हजार २०४ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. सध्या एक हजार ४१३ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील ३८ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. गुरुवारी नांदेडमधील पिरबुऱ्हानगर येथील महिलेचा (वय ६५) खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ६०८ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

जिल्ह्यात या ठिकाणी आढळले रुग्ण

गुरुवारी महापालिका क्षेत्रात १८९, नांदेड ग्रामीण सहा, अर्धापूर दोन, हदगाव दोन, कंधार एक, मुदखेड एक, उमरी दोन, यवतमाळ दोन, धर्माबाद दोन, हिमायतनगर दोन, लोहा आठ, मुखेड तीन, हिंगोली एक असे एकूण ११८ बाधित आढळले. देगलूर तीन, बिलोली एक, मुखेड सहा, भोकर १६, धर्माबाद एक व लोहा एक असे एकूण २५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले. 

खासगी रुग्णालयात १२१ रुग्ण 

जिल्ह्यात एक हजार ४१३ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ७३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ८८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) ६५, किनवट कोविड रुग्णालयात ३६, मुखेड कोविड रुग्णालय २५, हदगाव कोविड रुग्णालय नऊ, महसूल कोविड केअर सेंटर ९९, देगलूर कोविड रुग्णालय सात, नांदेड महापालिकातंर्गत गृहविलगीकरण ६५४, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण २३६, खासगी रुग्णालयात १२१ रुग्ण आहेत. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - २५ हजार ४४० 
एकूण बरे - २३ हजार २०४ 
एकुण मृत्यू - ६०८ 
गुरुवारी पॉझिटिव्ह - २५० 
गुरुवारी बरे - ८३ 
गुरुवारी मृत्यू - एक 
उपचार सुरु - एक हजार ४९३ 
अतिगंभीर रुग्ण - ३८ 
प्रलंबित स्वॅब - २६५ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com