ॲन्टीजेन तपासणीवर व्यापाऱ्यांचा अविश्‍वास, तीन दिवसाचा जनता कर्फ्यू, कूठे ते वाचा?

साजीद खान
Thursday, 10 September 2020

वाई बाजार येथील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १५ झाली असून त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. १०) रोजी ग्रामपंचायत व व्यापारी संघटनेकडून ग्रामपंचायत कार्यालयात एक तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत तीन दिवस कडकडीत बंद पाळून जनता कर्फ्यू लावण्याचे ठरले.

वाई बाजार (जिल्हा नांदेड) : वाई बाजार येथे दिवसोदिंवस कोरोना बाधीत रूग्णाच्या संख्येत भर पडत असून अँन्टिजन टेस्ट नुसार १४ ऑगस्टपासून आज पर्यंत १२५ तपासण्या करण्यात आल्या. त्यात ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर चार रुग्णांची तपासणी माहूर येथे करण्यात आली. असे एकूण वाई बाजार येथील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १५ झाली असून त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. १०) रोजी ग्रामपंचायत व व्यापारी संघटनेकडून ग्रामपंचायत कार्यालयात एक तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत तीन दिवस कडकडीत बंद पाळून जनता कर्फ्यू लावण्याचे ठरले. व्यापाऱ्यांनी मात्र ॲन्टीजेन तपासणीला विरोध दर्शविला आहे.
 
गावात कोरोनाचा फैलाव व्यापा-यातून होत असल्याची सर्वत्र चर्चा असल्याची कबुली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल रूणवाल यांनी दिली. मागील काही दिवसात विशेषता बाजार पेठेतील व्यापाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. यामुळे व्यापारी वर्गात कोरोना अजाराविषयी भीतीचे वातावरण निर्माण होऊन एकच खळबळ उडाली आहे. वाई बाजारमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता ग्राम पंचायत व व्यापारी संघटनेने संयुक्तरित्या गुरुवारी ग्राम पंचायतीत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी व प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी गावातील दुकाने तिन दिवस कळडीत बंद ठेऊन जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेन्यात आला आहे. 

हेही वाचा -  नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन झाले कोरोनामुक्त -

नियमाचे ऊलंघन करेल त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही 

जे कोणी नियमाचे ऊलंघन करेल त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. रूणवाल यांनी म्हंटले आहे. ते पुढे म्हणाले की, गावात कोरोनाचा पहिला शिरकाव हे गावातील व्यापा-या कडून झाला असून त्या अनुषंगाने व्यापा-यांनी सावधगीरी बाळगणे, स्व:तची काळजी घेऊन कोरोना ॲन्टीजेन तपासणी करण्याचे आवाहन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल रुणवाल यांनी केले होते. परंतू अध्यक्षानी सुचविलेल्या या टेस्टला व्यापा-यानी विरोध दर्शवून सपशेल इन्कार केला आहे. अशा पद्धतीने सरसकट ऑंटीजेन तपासण्या केल्या तर मार्केटमधील निम्मे व्यापारी पॉझिटिव येतील असे सांगत ऑंटीजेन रॅपिड तपासणीवर एक प्रकारे अविश्वास दर्शविलेला आहे. 

यांचा होती उपस्थिती 

तातडीने बोलविण्यात आलेल्या बैठकीत उपसरपंच हाजी उस्मान खान, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल रुणवाल, नवीद खान, फिरोज खान, अमजद खान, व्यापारी उस्मान अकबनी, नितीन कन्नलवार, विकी उपग्नलावर, संदीप विश्वनाथवार, बंडू सावकार, नंदू कटकमवार आदींची उपस्थिती होती.

येथे क्लिक कराधक्कादायक घटना : मुल होत नसल्याने पती- पत्नीची एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या.. -

भीती न बाळगता ऑंटीजेन तपासणी करून घ्यावी

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोक तपासणी करून घेण्यासाठी विरोध करत असून फारसा प्रतिसाद देत नाहीत. वास्तविक पाहता या आजाराची साखळी तोडायची असेल तर अधिक प्रमाणात स्वयंस्फूर्तीने ऑंटीजेन तपासण्या होणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता ऑंटीजेन तपासणी करून घ्यावी. जेणेकरून रुग्णावर वेळीच उपचार करता येईल व आजाराच्या फैलावला रोखता येईल.
- डॉ.श्रीनिवास हुलसुरे, वैद्यकीय अधिकारी, वाई बाजार, ता. माहूर.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traders distrust antigen test, three-day public curfew, where to read it?