व्यापाऱ्यांना वित्तीय तुट तरीही कपड्यावर मिळतेय ‘सुट’  

व्यापाऱ्यांना वित्तीय तुट तरीही कपड्यावर मिळतेय ‘सुट’  

नांदेड : दिवाळी नाही की दसरा नाही तरीही रेडीमेड कपड्यांवर ४० ते ६० टक्क्यापर्यंत भरघोस अशी सुट दिली जात आहे. अगदी तिसऱ्या लॉकडाउनपर्यंत बाजारापेठ बंद होती. त्यामुळे प्रत्येक वस्तूचे दर हे मुळ किमतीपेक्षा जास्त होते. अनेकांनी याचा फायदा करुन घेतला आहे. परंतु, हळुहळु बाजारातील दुकाने उघडण्यास सुरु झाली अन् शहरातील कापड दुकानदारांनी तर दुकाने उघडताच तयार कपड्यांवर सवलत देणे सुरु केले आहे. 

शहरातील श्रीनगर, शिवाजीनगर, वजिराबाद, जुना मोंढा भागातील कपड्यांची मोठमोठी दालने आहेत. ही दालने लॉकडाउनच्या ६० दिवसानंतर तीन दिवसांपासून सर्वांसाठी खुली झाली आहे. गुढी पाडव्यानंतर खऱ्या अर्थाने मराठी सण उत्सवाला सुरुवात होते. या दरम्यान लगीनसराई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव, रमजान ईद, उन्हाळ्यात घालण्यासाठी विशेष कपड्यांचे सेल लागल्याने बाजारपेठ गजबजलेली असते.  एकापाठोपाठ अनेक सण उत्सवाला सुरुवात होते. त्यापूर्वीच दुकानदारांनी देखील नवीन माल खरेदी केलेला असतो आणि हा माल पावसाळा सुरु होण्यापूर्वीच संपवायचा असतो. पावसाळ्यात ग्राहकांची बाजारातील वर्दळ थांबलेली असते.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आॅफर

पावसाळा संपत आला की कापड दुकानात दिवाळीसाठी नवीन माल खरेदी करायचा असतो. यंदा मात्र कोरोना संसर्गामुळे सर्वच विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अनेक दुकानांवर कापड खरेदीसाठी सवलत आणि जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारची आॅफर असल्याच्या दुकानदारांकडून प्रतिक्रिया मिळाल्या.

तयार कपड्यांवर ४० ते ६० टक्के सवलत

नेहमीप्रमाणे यावर्षी देखील श्रीनगर, वजिराबादच्या मुख्य बाजारपेठेत कपड्यांचे सेल लागले होते. परंतु, अचानक लॉकडाउन झाल्याने दोन महिण्यापासून दुकाने शटर बंद होती. त्यामुळे बाहेरुन आलेल्या कापड सेल वाल्यांना ‘इकडे आड, तिकडे विहिर’ अशी अवस्था झाली होती. परंतु, लॉकडाउनमध्ये सुट देण्यात आल्याने त्यांना देखील आहे तो माल विकुन लवकर घरी जाण्याची घाई झाली आहे. यामुळे शहरातील कापड दुकानांवर तयार कपड्यांवर ४० ते ६० टक्के इतकी सवलत दिली जात आहे.    

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com