एकाच छताखाली हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा

धोंडीबा बोरगावे
Saturday, 29 August 2020


त्याचं मूळ कारण म्हणजे या गावात अठरापगड जाती, धर्माचे लोक वास्तव्यास असतानाही या गावात धार्मिक किंवा जातीय तेढ कधीच निर्माण न होऊ देता येथे सर्वच सण, उत्सव, जयंत्या साजरे करण्यासाठी प्रत्येकजण बंधुभाव जागृत ठेवून एकत्रित येऊन असे सण साजरे केले जातात. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे आजघडीला एकाच छताखाली श्री गणेश मूर्तीची आणि मोहरमनिमित्त नालेहैदरची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

फुलवळ, (ता.कंधार, जि. नांदेड)ः कंधार तालुक्यातील फुलवळ हे मानार प्रकल्पाच्या बॅकवॉटरच्या काठाशेजारी असलेले जवळपास सहा ते सात हजार लोकसंख्या असलेले जिल्हा परिषद गटाचे गाव असून, तसे नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांनी असो का राजकीय घडामोडीसाठी असो; पण सदैव सर्वत्र सुपरिचित असणारे गाव आहे.

नालेहैदरची प्राणप्रतिष्ठा
त्याचं मूळ कारण म्हणजे या गावात अठरापगड जाती, धर्माचे लोक वास्तव्यास असतानाही या गावात धार्मिक किंवा जातीय तेढ कधीच निर्माण न होऊ देता येथे सर्वच सण, उत्सव, जयंत्या साजरे करण्यासाठी प्रत्येकजण बंधुभाव जागृत ठेवून एकत्रित येऊन असे सण साजरे केले जातात. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे आजघडीला एकाच छताखाली श्री गणेश मूर्तीची आणि मोहरमनिमित्त नालेहैदरची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

हेही वाचा -  कोरोना : आज शुक्रवारपासून लोहा शहर पाच दिवस कडकडीत बंद राहणार

दोन्ही देवांचे दर्शन एकाच वेळी
सध्या हिंदूंसाठी श्री गणेशोत्सवचा उत्सव चालू असल्याकारणाने फुलवळमध्ये जुनेगावठाण येथील सांस्कृतिक सभागृहात सार्वजनिक गणेश मंडळाकडून श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. तर त्यातच मुस्लिम बांधवांचा पवित्र मानला जाणाऱ्या मोहरम महिन्याची सुरवात झाली आणि प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोहरमनिमित्त सवाऱ्या बसवण्याची तयारी झाली आणि त्याच सभागृहात एकाच छताखाली अगदी श्री गणेशमूर्तीच्या शेजारीच नालेहैदरची स्थापना करण्यात आली. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक हिंदू-मुस्लिम भक्तांना या दोन्ही देवांचे दर्शन एकाच वेळी घेता येते आणि दोन्ही देवांना नैवेद्य ही एकाच वेळी ठेवत आहेत. हा एक सामाजिक ऐक्याचा संदेशच फुलवळकरांकडून पहायला मिळतो आहे.

उत्सवाचा आनंद मनमुरादपणे
जसे गणेशोत्सवामध्ये श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून अकरा दिवस पूजाअर्चा केली जाते; तसेच गेली शेकडो वर्षांपासून फुलवळमध्ये मोहरमनिमित्त येथे मौलाअली, काशीम दुल्हे, नालेहैदर, कवडीपीर, डोला आदी देवांची प्राणप्रतिष्ठा करून सलग पाच दिवस पूजाअर्चा केली जाते. गेल्या दोन वर्षांपासून तर हमखास गणेशोत्सव आणि मोहरम एकाच वेळी येत असल्याकारणाने एकाच सभागृहात, एकाच छताखाली या दोन्ही देवांची स्थापन मोठ्या उत्साहात करून गावकरी दोन्ही उत्सवाचा आनंद मनमुरादपणे लुटतात; परंतु यंदा कोरोनाने सर्वत्र कहर घातल्यामुळे शासन व पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत, शासन आदेशाला प्रतिसाद देत हे सण, उत्सव साजरे केले जात आहेत.

संपादन - स्वप्निल गायकवाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Tradition Of Hindu Muslim Unity Under One Roof, Nanded News