नांदेडमधील धक्कादायक घटना : देगलूर नाका परिसरात सहा तास बांधून दोघांना बेदम मारहाण; पाच जणांना पोलिस कोठडी

file photo
file photo

नांदेड : शहराच्या देगलूर नाका परिसरात ता. २७ जानेवारीच्या रात्री साडेआठ ते ता. २८ जानेवारीच्या पहाटे तीनपर्यंत दोघांना दुचाकीवरुन पळवून नेऊन गोदावरीच्या तिरावर दोरखंडाने बांधून तब्बल सहा तास मारहाण करणाऱ्या आठ जणांविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. तीन) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

देगलुर नाका परिसरात राहणारा मोहम्मद वाजिद कुरेशी मोहम्मद बाबु कुरेशी हा व त्याचा मित्र अमिनोद्दीन हे देगलुर नाका परिसरात असलेल्या डील्कस फंक्शन हाॅलसमोर बोलत थांबले होते. यावेळी जुन्या वादातून या दोघांचे ता. २७ जानेवारी रात्री साडेआठच्या सुमारास आयुब मोहम्मद जान आयुब जब्बार आणि मोहमद आमेर हे दोघे त्यांच्याजवळ दोन दुचाकवरुन आले. या दोघआंना दुचाकीवर बसवून देगलूर नाका परिसरात असलेल्या गोदावरी नदी काठी नेले. हे पोहचण्यापूर्वी तेथे मोहम्मद अमिर इमरान मन्नान, आयुबचा भाऊ, आयुबचा नोकर आणि इतर एक व्यक्ती तेथे होते.

या सर्वांनी दोघांना दोरखंडाने बांधले. तुझ्या मित्राला बोलावून घे म्हणून जबर मारहाण केली. यावेळी रिजवान कुरेशी याला तिथे बोलावून घेतले. यावेळी रिजवान कुरेशीलाही फावड्याच्या दांड्याने जबर मारहाण केली. या तिघांना रात्रभर तब्बल सहा तास मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर त्यांनीच या मारहाणीचा व्हिडिओ तयार केला. आणि तो व्हिडीओ सोशल माध्यमावर व्हायरल केला. यानंतर हा धक्कादयाक प्रकार समोर आला. 

हा व्हिडीओ सोशल माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनानेही गंभीर दखल घेतली. यानंतर मारहाण झालेला मोहम्मद वाजीद फिर्यादीवरुन इतवारा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये आठ जणांवर गुन्हा दाखल केला. यात मोहम्मद आयुब, आयुब जब्बार, मोहम्मद अमीर, इमरान, मोहम्मदचा भाऊ, मोहम्मद नोकर आणि इतर दोन अशा आठ जणांविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे करत आहेत. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. मारहाणीचे कारण अद्याप गुलदस्यात असून याती पाच जणांना पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर गहजर केले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com