नांदेड परिक्षेत्रातील पीआय, एपीआय आणि पीएसआय यांच्या बदल्या

file photo
file photo

नांदेड : नांदेड पोलिस परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्रातील नऊ पोलिस निरीक्षक, १२ सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि १८ पोलीस उपनिरीक्षक अशा ३९ अधिकाऱ्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात काही जणांना सार्वत्रिक बदल्या २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. काही जणांच्या प्रशासकीय तर काहींच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.

प्रशासकीय बदल्यामध्ये पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण हे नांदेडहून लातूर जिल्ह्यात संलग्न करण्यात आले होते. ते सध्या उदगीर येथे कार्यरत आहेत. त्यांची बदली परभणी जिल्ह्यात करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील सुनील निकाळजे यांना सार्वत्रिक बदल्या २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सी. टी. चौधरी यांना नांदेड येथून परभणी येथे पाठविले आहे. हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांना नांदेड जिल्ह्यात बोलावले आहे. तर प्रदीप काकडे यांना नांदेड येथून परभणी येथे पाठविण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांना हिंगोली येथे पाठविण्यात आले आहे. महेश शर्मा यांना लातूर येथून अगोदरच नांदेड येथे संलग्न करण्यात आले होते. त्यांना नांदेड येथे कायम नियुक्ती दिली आहे. परभणी येथील गजानन भातलवंडे यांना लातूर जिल्ह्यात पाठविले आहे. तर अशोक घोरबांड यांना परभणी येथून नांदेड जिल्ह्यात बोलावले आहे.

प्रशासकीय कारणावरुन पीआयच्या बदल्या

प्रशासकीय कारणावरून सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यामध्ये भागोजी चोरमले, अजयकुमार पांडे या दोघांना सार्वत्रिक बदल्या २०२१ पर्यंत परभणी येथे मुदतवाढ दिली आहे. परभणीचे सुनील गिरी हे हिंगोली येथे जाणार आहेत. परभणीचे गजेंद्र सरोदे यांना लातूरला पाठविण्यात आले आहे. लातूरचे सुनील अजित वाढवे यांना नांदेड येथे बोलावले आहे.

विनंतीवरुन यांच्या बदल्या

विनंतीवरून नांदेडचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश भाले यांना परभणी तर लातूरचे महादेव पुरी हे नांदेडला येत आहेत. नांदेडचे सुरेश गायकवाड हे लातूरला जाणार आहेत तर शिवराज जमदाडे, दुर्गा बारसे, राजू मोड हे परभणी येथे येथून नांदेडला येत आहेत. तर सदानंद येरेकर हे हिंगोली जिल्ह्यातून नांदेडला येत आहेत.

प्रशासकीय कारणावरुन

प्रशासकीय कारणावरून नांदेडचे फौजदार गणेश कराड, दिगंबर जामोदकर, माधव झडते या तिघांना२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर मिर्झा अंवर बेग यांची सेवानिवृत्ती दोन वर्षात होणार असल्याने त्यांना नांदेड येथे मुदतवाढ मिळाली आहे. नांदेड येथील मनिषा पवार परभणी येथे जात आहे, तर परभणी येथून उदय सावंत, रवी मुंडे, गंगाप्रसाद दळवी आणि लातूरचे संतोष गीते हे चौघेजण नांदेडला येत आहेत. लातूरचे विजय पाटील यांना सार्वत्रिक बदल्या २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक यांच्या विनंतीनुसार पुढील बदल्या प्रमाणे नांदेडचे गणेश राठोड- हिंगोली, संदीप कराड- लातूर, स्वाती कावळे- परभणी, संतोष शिरसेवाड- लातूर, परभणी येथील शिवाजी बोधले आणि रुपाली कांबळे हे दोघेजण नांदेड जिल्ह्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com