esakal | नांदेड जिल्हांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वजिराबादला भंडरवार तर माहूरला रिठे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी जिल्ह्यातील आठ पोलिस निरीक्षक आणि १८ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या केल्या आहेत.

नांदेड जिल्हांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वजिराबादला भंडरवार तर माहूरला रिठे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : मागील काही दिवसांपासून पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या प्रलंबीत होत्या. त्यामुळे अनेकांनी ठाणे मिळावे म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे फिल्डींग लावली होती. अखेर ता. २९ जानेवारी रोजी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी जिल्ह्यातील आठ पोलिस निरीक्षक आणि १८ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या केल्या आहेत.

पोलिस निरिक्षकामध्ये जगदीश भंडरवार यांना वजिराबाद पोलिस ठाणे देण्यात आले असून तेथील संदीप शिवले यांच्या खांद्यावर आर्थीक गुन्हे शाखेची जबाबदारी टाकण्यात आली आहे. मुदखेड येथील सुनिल निकाळजे यांना नियंत्रण कक्षात आणून त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे महेश शर्मा यांना तर नियंत्रण कक्षातील नामदेव रिठे यांना माहूरचे लक्ष्मण राख यांच्या ठिकाणी पाठविले आहे. विलास गोबाडे यांना मुखेड पोलिस ठाणे बहाल करण्यात आले. तेथील नरसिंग आकुसकर यांची पदोन्नतीवर बदली झाल्याने त्यांना नांदेडच्या जिल्हा जात पडताळणी समिती येथे जाण्यासाठी कार्यमुक्त केले आहे. 

हेही वाचा - विदेशी व परराज्यातील आरोपी नांदेड पोलिसांच्या जाळ्यात; शंकर नागरी बँक १४ कोटी अपहार प्रकरण

सतरा सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या 

अनंत भंडे नियंत्रण कक्ष ते किनवट, आश्रुबा घाटे माळाकोळी ते नियंत्रण कक्ष, माणिक डोके शिवाजीनगर ते माळाकोळी, नामदेव मद्दे तामसा ते माहूर, फिरोजखान पठाण इतवारा ते शिवाजीनगर, राजु मुत्येपोड नियंत्रण कक्ष ते इतवारा, विजयकुमार कांबळे ते भाग्यनगर, संतोष केंद्रे मांडवी ते मुखेड, मल्हारी शिवरकर सिंदखेड ते मांडवी, राजेंद्र मुंढे मनाठा ते नियंत्रण कक्ष, विनोद चव्हाण भाग्यनगर मनाठा, अशोक उजगरे धर्माबाद ते तामसा, भालचंद्र तिडके माहुर ते सिंदखेड, दुर्गा बारसे नियंत्रण कक्ष ते विमानतळ सुरक्षा, शिवराज तुगावे नियंत्रण कक्ष ते बारड, शिवराज कत्ते विमानतळ सुरक्षा ते धर्माबाद, राजू वटाने नियंत्रण कक्ष ते मुदखेड येथे पाठविण्यात आले आहेत.

loading image