पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते खुरगावात वृक्षारोपण 

शिवचरण वावळे
Monday, 7 December 2020

श्रामनेर प्रशिक्षण केंद्र हा एक अभिनव आणि समाजोपयोगी उपक्रम आहे. या केंद्रामुळे नांदेड जिल्ह्यातील तसेच या परिसरातील लोकांना बौद्ध धम्माच्या मार्गाने जीवनाची वाटचाल करण्याची मोठी प्रेरणा मिळेल, अशी भावना याप्रसंगी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी व्यक्त केली.

नांदेड- येथून जवळच असलेल्या मौजे खुरगाव येथे बौद्ध धम्म श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी (ता. सहा) अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. पूज्य भदंत पैंयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या भव्य श्रामणर प्रशिक्षण शिबिराच्या सभागृह परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी बोलताना श्री. शेवाळे म्हणाले की, भदंत पैंया बोधी यांनी खुरगाव येथे सुरू केलेले श्रामनेर प्रशिक्षण केंद्र हा एक अभिनव आणि समाजोपयोगी उपक्रम आहे. या केंद्रामुळे नांदेड जिल्ह्यातील तसेच या परिसरातील लोकांना बौद्ध धम्माच्या मार्गाने जीवनाची वाटचाल करण्याची मोठी प्रेरणा मिळेल, अशी भावना याप्रसंगी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा- नांदेड : तीन दुचाकी चोरांना अटक, दागिणे व दुचाकीसह सात लाखाचा मुद्देमाल जप्त- शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

संविधानातून माणूस नावाच्या सौंदर्याची निर्मिती 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात व सत्ताकेंद्राच्या विरोधात लढा दिला. जात धर्म विरहित मानवी समुहाची पुनर्रचना करणाऱ्या धम्माचे अनुसरण केले. त्यामुळेच बाबासाहेबांच्या आयुष्यभरातील अथक संघर्षातून भारतीय संविधानाच्या माध्यमातून माणूस नावाच्या सौंदर्याची निर्मिती केली असे प्रतिपादन भंते पंय्याबोधी थेरो यांनी केले. 

यांचा होता सहभाग 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी (ता. सहा) श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, भंते मेत्तानंद, भंते धम्मकीर्ती, भंते चंद्रमणी, भंते संघरत्न, भंते धम्मशिलो, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते सुभद्र, प्राचार्य विकास कदम, ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी, आकाशवाणीचे शंकर नरवाडे, अनुरत्न वाघमारे, गंगाधर ढवळे, पांडूरंग कोकुलवार, नागोराव डोंगरे, मारोती कदम, कैलास धुतराज, रुपाली वैद्य यांची उपस्थिती होती. 

हेही वाचा- नांदेड जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य बिघडले, आल्कधर्मी जमिनीच्या प्रमाण वाढले ​

कवितेतून महामानवास अभिवादन 

याप्रसंगी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सप्तरंगी साहित्य मंडळाचे भोजनदान, बांधकामासाठी विटदान आणि कविसंमेलन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करणयात आले होते. पंचफुला वाघमारे, थोरात बंधू, अनिकेत कुलकर्णी, विकास कदम, शंकर नरवाडे, राजेश गायकवाड, मारोती कदम, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, रणजीत गोणारकर, रुपाली वैद्य वागरे, नागोराव डोंगरे, कैलास धुतराज, निवृत्ती लोणे, गंगाधर ढवळे, सुभाष लोकडे, सुदामा हिंगोले, पांडूरंग कोकुलवार, अनुरत्न वाघमारे यांनी कवितेतून महामानवास अभिवादन केले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree planting in Khurgaon by Superintendent of Police Pramod Shewale Nanded News