हरीत नांदेड अभियानांतर्गत महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा व वृक्षमित्र फाऊंडेशनतर्फे वृक्ष लागवड

file photo
file photo
Updated on

नांदेड : नांदेड शहरात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून वृक्षलागवड हरीत नांदेड अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरातील विविध कॉलनी, मोकळ्या जागा, मुख्य रस्ते, विविध उद्यानात जिथे संगोपनाची हमी असेल तिथे निःस्वार्थ भावनेतून वृक्षलागवड वृक्षमित्र स्वतः खड्डे करुन करीत आहेत. या अभियानांतर्गत या वर्षी शहरात चार ठिकाणी घनवन वृक्षलागवडही करण्यात आलेली असून आतापर्यंत वृक्षमित्र फाऊंडेशनतर्फे जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड वृक्ष भेट देऊन करण्यात आलेली आहे.

हरीत नांदेड अभियानांतर्गत वृक्षमित्र फाऊंडेशन व महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (ता. २७) डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सिडको येथील माता कन्यका भवन, मंगल कार्यालय परिसरात आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, उपाध्यक्ष सुभाष कन्नावार, सचिव गोविंद बिडवई तसेच दिलीपभाऊ कंदकुर्ते, डॉ. डी. आर. मुखेडकर, अनिल मनाठकर, ज्ञानेश्वर महाजन, सुधाकर वट्टमवार, डॉ. किरण चिद्रावार, पांडुरंग बच्चेवार, डॉ. नरेश रायेवार, विजय बंडेवार, गणेश गादेवार यांच्या शुभहस्ते वृक्षलागवड करुन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी याप्रसंगी महासभा लोकचळवळीस सहकार्य करेल व पर्यावरण संवर्धनात भविष्यातही पुढाकार घेईल, असा विश्वास दिला.

या वृक्षलागवड कार्यक्रमात ३१ मोठ्या निसर्गपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमात वृक्षमित्र फाऊंडेशनचे कैलास अमिलकंठवार, गणेश साखरे, प्रीतम भराडीया, प्रल्हाद घोरबांड, लक्ष्मण गज्जेवार, माणिक अन्नपूर्णे, सचिन जोड, प्रदीप मोरलवार, मंगेश महाजन, प्रताप खरात, प्रशांत रत्नपारखी, मनोज गुंजावळे, लोभाजी बिरादार, गौरांग देशटवार, दत्ता पावडे, राजेश्वर कमटलवार, सुरेश कोटगिरे, प्रभाकर महाजन, श्रीनिवास कोटगिरे, अरुणपाल ठाकूर या सर्व वृक्षमित्रांनी वृक्षलागवड केली.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com