esakal | नांदेडच्या ऐतिहासीक टॉवरवर वृक्षवल्ली आम्हा सोयरी...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दर्शनी असलेल्या या टॉवरवर मोठ्या प्रमाणात वृक्ष निघाल्याने त्याचे विद्रुपीकरण होत आहे. मात्र महापालिकेकडे हे वृक्ष तोडण्यासाठी वेळ नसल्याचे बोलल्या जात आहे. तसेच परिसर घाणीच्या विळख्यात अडकला आहे. 

नांदेडच्या ऐतिहासीक टॉवरवर वृक्षवल्ली आम्हा सोयरी...

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड शहराची ओळख म्हणून जुना मोंढा भागात असलेल्या ऐतिहासीक टॉवरची दुरावस्था झाली आहे. जुन्या नांदेड शहरातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या टॉवरचे दर्शन घेतल्यानंतरच पुढे जाता येते. दर्शनी असलेल्या या टॉवरवर मोठ्या प्रमाणात वृक्ष निघाल्याने त्याचे विद्रुपीकरण होत आहे. मात्र महापालिकेकडे हे वृक्ष तोडण्यासाठी वेळ नसल्याचे बोलल्या जात आहे. तसेच परिसर घाणीच्या विळख्यात अडकला आहे. 

नांदेड शहरात जुना मोंढा टॉवर हे सुरवातीच्या काळात राजकिय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सभा येथून होत होत्या. या परिसरातून कै. शंकरराव चव्हाण, उपराष्ट्रपती व्यंकया नायडू, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, प्रकाश आंबेडकर यांच्यासह आदी नेत्यांच्या सभा झालेल्या आहेत. शहराच्या नाभिस्थळी असलेल्या या टॉवरची मागील काही काळापासून दुरावस्था सुरु आहे. मागील दोन वर्षापासून टॉवरची दुरावस्था होत आहे. या टॉवर परिसरात जुना मोंढा असल्याने हमाल व कामगारांची संख्या मोठी आहे. या कामगारांना वेळ पाहण्यासाठी महापालिकेने चारही दिशांना घड्याळ लावले होते. मात्र ते घड्याळ बंद पडले. 

हेही वाचाVideo - नांदेड : युवा बागायतदाराने पानमळा शेती फुलवून उत्पन्नाने साधली प्रगती

नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधींनाही वेळ नाही

आता तर चक्क या टॉवरवर पिंपळ, वड व आदी वृक्ष लागवड केल्यासारखे वाढत आहेत. हे वृक्षांची मळ खोलवर जातात. यामुळे टॉवरला धोका होऊ शकतो. या वृक्षांची तोड करणे आवश्‍यक आहे. मात्र महापालिका त्याकडे लक्ष देत नाही. तसेच या भागाचे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधींनाही वेळ नाही. यासोबतच या टॉवरजवळ सुलभ शौचालय बांधून त्याचा योग्य वापर होत नसल्याने रस्त्यावरुन ये- जा करणाऱ्या महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका आयुक्त यांनी याबाबत ठोस निर्णय घेऊन हा परिसर स्वच्छ कसा राहिल याकडे लक्ष दिल्यास नांदेडच्या या ऐतिसाहीक वैभवाची दुरावस्था होणार नाही.