त्रिपुरा राज्याला पन्नास वर्षे पूर्ण : सद्भावना रॅलीचे नांदेड नगरीत स्वागत

त्रिपुरा राज्याला पन्नास वर्षे पूर्ण : सद्भावना रॅलीचे नांदेड नगरीत स्वागत

नांदेड : त्रिपुरा राज्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संपूर्ण देशामध्ये युवा विकास केंद्र व त्रिपुरा नेफाचे सदस्य यांनी भारत भ्रमण करणारी सद्भावना रॅली आयोजित केली. याच निमित्ताने शुक्रवारी (ता. ३०) देबासीस मुजुमदार व त्यांची अकरा जणांची टीमचे नांदेडमध्ये आगमन झाले. नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा येथे दर्शन घेऊन या रॅली नांदेड शहरात सुरुवात झाली या रॅलीचे आयोजन युवा विकास केंद्र, निफा व त्रिपुरा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आलेले आहे.

या रॅलीचे उद्देश्य म्हणजे देशामध्ये शांतता नांदावी एकोप राहावे, समता बंधुता वाढावी, आत्मनिर्भर होण्यासाठी युवकांनी पुढे यावे, वृक्षारोपण व रक्तदान करण्यासाठी युवकांना जागृत करण्याचा काम अशा विविध  संदेश घेऊन या रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. विशेषता येणाऱ्या ता. २३ मार्च रोजी संपूर्ण भारत देशामध्ये दीड हजारपेक्षा अधिक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे मानस आहे व गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचं मानस निफाने ठेवण्याचा संदेश देखील यावेळेस देण्यात आले.

सचखंड गुरुद्वारा येथे बाबाजींच्या हस्ते व कारसेवावाले बाबा बलविंदरसिंग यांच्या हस्ते या सर्व यात्रेकरूंचा विशेष सन्मान सत्कार करण्यात आला. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन खासदार या नात्याने त्यांनी देखील शाल पुष्पगुच्छ देऊन सर्व यात्रेकरूंचा स्वागत सन्मान केले. एनएसबी कॉलेज ग्राउंड येथे युवकांशी संवाद व मुख्य कार्यक्रम म्हणजे नांदेड क्लब येथे वृक्षारोपण व भव्य स्वागत आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वांना संबोधित करत असताना नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर म्हणाले त्रिपुरा राज्यातील प्रमुखाने स्किलवर जास्त भर देण्यात आले. त्यामध्ये तिकडे बांबू लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. बांबूपासून विविध लोणचे, बॉटल असे साहित्य बनवण्यात येतात. हे साहित्य नांदेड शहरामध्ये पण युवकांना तसेच शेतकरी यांनी तयार करावे यासाठी नांदेड येथे आपणही असे प्रयत्न करू असे प्रतिपादन केले.

त्याच बरोबर डॉ. इटनकर म्हणाले की ही संस्था युवकांना आत्मनिर्भर, रक्तदान शिबिर सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी जनजागृती करत आहे तर त्याचबरोबर आजचा युवक खूप मोठ्या प्रमाणात नशा करत आहे या नशा करणाऱ्या लोकांना पण नशा सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी असे सूचना केले यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, संपादक शंतनू डोईफोडे, भाजपा महानगर अध्यक्ष प्रवीण साले, निफाचे हर्षद शहा नीफा, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे, किशोर स्वामी यांनी आपले मनोगत मांडले. डॉ. भरत जेठवाणी प्रदेश अध्यक्ष निफा महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथील सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले. यावेळी निफाचे सदस्य भास्कर डोईबळे, गणेश चाडोळकर, सुश्मिता देशमुख, साईनाथ कूलथे, आकाश बागडे, नईम खान, जगबीर सिंग सोडी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com