esakal | देगलूर पोटनिवडणुकीच्या रिंगणात बारा जण, २३ अर्ज झाले होते दाखल | Deglur Bypoll
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक

देगलूर पोटनिवडणुकीच्या रिंगणात बारा जण, २३ अर्ज झाले होते दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देगलूर (जि.नांदेड) : विधानसभेच्या देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Deglur Bypoll) उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता.१३) नऊ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रिंगणातील बारांपैकी सहा उमेदवार बाहेरच्या मतदारसंघातील रहिवासी आहेत. गत निवडणुकीवेळी वंचित आघाडीचे उमेदवार असलेल्या रामचंद्र भरांडे यांनी यावेळी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घेतला. भाजपचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे कट्टर समर्थक असलेले माजी उपनगराध्यक्ष धोंडीबा तुळशीराम कांबळे यांनीही अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज नाट्यमयरीत्या मागे घेतली. त्यामुळे खतगावकर गट पोटनिवडणुकीपासून (Nanded) अलिप्त राहतो की काय, अशी सुरु झालेली चर्चा तूर्त थांबली आहे. वनसेवेतील निवृत्त अधिकारी विश्वंभर जळबा वरवंटकर यांनीही निवडणुकीतून माघार घेतली.

हेही वाचा: भागवत कराड डॉक्टर असले, तरी मी आई आहे! पंकजा मुंडेंचा टोला

अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यात प्रल्हाद हटकर, धोंडीबा कांबळे, सूर्यकांत भोरगे, रामचंद्र भरांडे, आनंदा रुमाले, लक्ष्मण देवकरे, विठ्ठलराव चाबुकसार, विश्वंभऱ वरवंटकर, सिद्धार्थ हटकर या नऊ जणांचा समावेश आहे. २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील दोन अर्ज बाद झाले होते.

loading image
go to top