esakal | बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे ठार; हदगाव तालुक्यातील ठाकरवाडी येथील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आखाड्यावर बांधलेल्या वासरावर रात्रीच्या वेळी बिबट्याने अचानक हल्ला करुन दोन वासरे ठार केल्याची घटना नुकतीच घडली.

बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे ठार; हदगाव तालुक्यातील ठाकरवाडी येथील घटना

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : हदगाल तालुक्यातील तामसा परिसरात असलेल्या ठाकरवाडी येथील एका शेतकऱ्यांच्या आखाड्यावर बांधलेल्या वासरावर रात्रीच्या वेळी बिबट्याने अचानक हल्ला करुन दोन वासरे ठार केल्याची घटना नुकतीच घडली. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हदगाव तालुक्यातील ठाकरवाडी येथील शेतकरी विठ्ठल मुरमुरे यांनी आपल्या शेतातील आखाड्यावर गाई वासरे बांधली होती. रात्रीच्यावेळी पाऊस सुरु झाल्याने शेतकरी झोपड्यात झोपला. यावेळी बिबट्याने बांधलेल्या वासरांवर हल्ला केला. त्यात एक वासरु पूर्ण फस्त केले तर दुसऱ्या वासरावर केलेल्या हल्ल्यात ते ठार झाले. पाऊस उघडल्यानंतर शेतकरी झोपडीतून बाहेर आला असता समोरच भयानक दृश्य पाहून तो घाबरुन गेला. 

हेही वाचा घरफोडीतील तीन चोरटे पोलिस कोठडीत; नांदेडच्या सिडकोत फोडले होते गोदाम

बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे ठार झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. त्यानंतर हदगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तामसा वन परिमंडळाचे वनपाल मनोज गुरसाळे, वनरक्षक श्रीमती भंडारे यांनी मुरमुरे यांच्या शेतावर जाऊन घटनेचा पंचनामा केला. उल्लेखनीय बाब म्हणजे जंगलातील पाण्याचे साठे कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी जंगलातील हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. त्यात जनावरावर हल्ले होत आहेत. त्यामुळे वनविभागाने वन्यप्राण्यांसाठी जंगलात पिण्याच्या पाण्याची सोय करुन द्यावी अशी मागणी पशु पालकांमधून होत आहे.

loading image
go to top