esakal | नांदेडमध्ये दोन कारसह ४० किलो गांजा जप्त, गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड -  नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.२३) सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेडमध्ये दोन कारसह ४० किलो गांजा जप्त, गुन्हा दाखल

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : नायगावहून नांदेडला (Crime In Nanded) येणाऱ्या दोन कारची पोलिसांनी तपासणी केली असता चार लाखांचा गांजा आढळला. गांजा, दोन कारसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात (Nanded Rural Police Station) शुक्रवारी (ता.२३) सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारमधून गांजा वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच नांदेड (Nanded) ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. चंदासिंग कॉर्नरकडून ढवळे कॉर्नरकडे येत असलेल्या दोन कार कृषी उद्योग केंद्रासमोर थांबवल्या. त्यांची पंचासमक्ष तपासणी करण्यात आली. कारच्या डिकीत चार लाख रुपये किंमतीचा ४० किलो गांजा सापडला.(two cars and 40 kilo marijuana seized in nanded glp88)

हेही वाचा: आईसमोर शिवीगाळ केल्याने राग अनावर, मित्राचा चाकूने भोसकून खून

दोन्ही कारमधील अब्दुल रफीक अब्दुल मुबीन, जान मोहमंदखान आयुबखान (दोघे रा. कारंजा लाड, जि. वाशिम), शेख मुदसीर शेख इसाक (रा.नई आबादी, शिवाजीनगर, नांदेड), शेख उस्मान शेख मौला (रा.नंदीपेठ, नांदेड), इम्रानखान उक्काउल्लाखान, शेख मोहसीन अब्दुल रशीद, एक अल्ववयीन (सर्व रा. कारंजा लाड) यांना ताब्यात घेतले. गांजा व दोन्ही कार जप्त करण्यात आल्या. फौजदार गोविंद खैरे तपास करीत आहेत.

loading image
go to top